भारत आणि युरोपियन युनियनमध्ये ऐतिहासिक करार; काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
भारतीय बाजारातून मोठ्या संख्येने निर्यात वाढवण्यास मदत होईल. त्याचबरोबर आर्थिक संबंध अधिक मजबूत होण्यासही मदत होईल.
सध्याच्या घडीला सर्व जगाच्या नजरा या फक्त आणि फक्त भारताकडे आहेत. (India) तब्बल 18 वर्षाच्या मोठ्या तपानंतर भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार झाला आहे. आता हे करार देखील जाहीर झाले आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या मोठ्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केली आहेत.
यासोबतच सर्वच देशांसोबतचे व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला.विशेष म्हणजे काही उत्पादनांवरील कर कपात आणि थेट टॅरिफ रद्द करण्यावर सहमती देखील झाली. युरोपियन युनियनचे म्हणणे आहे की, या निर्णयानंतर भारतीय बाजारातून मोठ्या संख्येने निर्यात वाढवण्यास मदत होईल. त्याचबरोबर आर्थिक संबंध अधिक मजबूत होण्यासही मदत होईल. या करारानंतर भारतीय निर्यातीत मोठी वाढ होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व करारांना करारांची जननी देखील म्हटले आहे. या करारांमुळे चीन आणि अमेरिकेत होणारी निर्यात देखील वाढेल. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला, ज्यामुळे भारतातून होणारी निर्यात कमी झाली होती. त्याचा थेट काही क्षेत्रांमध्ये परिणाम देखील झाला होता. या करारानुसार,भारतात निर्यात होणाऱ्या 90 टक्क्यांपेक्षा जास्त EU वस्तूंवरील शुल्क काढून टाकले जाईल किंवा कमी केले जाईल.
अपघातानंतर रस्त्यावर उभं राहून कडाक्याचं भांडणं विसरा; गडकरींनी आणली कात टाकणारी टेक्नोलॉजी
या करारामुळे 2032 पर्यंत युरोपियन युनियनची भारताला होणारी निर्यात दुप्पट होऊ शकते. या करारामुळे भारतासाठी नवीन रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. हा भारताचा अत्यंत मोठा विजय नक्कीच म्हणावा लागेल. या करारामुळे थेट रोजगार निर्मिती होईल. भारत आणि युरोपियन युनियनमधील या करारानंतर अनेक वस्तू कमी दरात उपलब्ध होतील. कार आणि विविध रसायनाचा यामध्ये समावेश आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे देशात कारच्या किंमती दिवसेंदिवस महाग होताना दिसल्या. आता कुठेतरी याला लगाम लागताना नक्कीच दिसेल. बिअर, वाईन सारखे काही शीतपेय देखील स्वस्त होऊ शकतात. अन्न उत्पादनेही कमी होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, भारताने इतिहासातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार केल्याचंही बोललं जात आहे. जागतिक स्तरावर सप्लाय चेन मजबूत होईल. हा व्यापार संयुक्त समृद्धिची एक ब्लूप्रिंट आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-EU फ्री ट्रेड एग्रीमेंटवर बोलले आहेत.
दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या फ्री ट्रेड एग्रीमेंट करारामुळे भारत-EU संबंध अजून बळकट होतील. यात व्यापार, सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा सारख्या महत्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढेल. ही डील दोन्ही बाजूंसाठी आर्थिक आणि रणनितीक दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेने ही डील होण्याआधी एक प्रतिक्रिया दिली. त्यातून त्यांची अस्वस्थतता दिसून आली. ‘युरोप आपल्या विरुद्ध युद्धासाठी फंड देतोय’ असंही ट्रम्प यांचे मंत्री म्हणाले आहेत.
