Dollar Rate In India : रुपया सर्वकालीन नीचांकी पातळीवर, एका डॉलरची किंमत 90.82 रुपये
Dollar Rate In India : भारतीय रुपया पुन्हा एकदा डॉलरच्या तुलनेत घसरला आहे. मंगळवारी 16 डिसेंबर रोजी एका डॉलरची किंमत 90.82 रुपये झाल्याने
Dollar Rate In India : भारतीय रुपया पुन्हा एकदा डॉलरच्या तुलनेत घसरला आहे. मंगळवारी 16 डिसेंबर रोजी एका डॉलरची किंमत 90.82 रुपये झाल्याने भारतीय शेअर बाजारासह आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय गुंतवणूकदारांना मोठा फटका बसत आहे. समोवारी 15 डिसेंबर रोजी एका डॉलरची किंमत 90.78 इतकी होती. यावर्षी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 6-7 टक्क्यांनी घसरले आहे. त्यामुळे यावर्षी रुपया सर्वात कमकुवत कामगिरी करणाऱ्या उदयोन्मुख बाजार चलनांपैकी एक बनले आहे.
अमेरिकेकडून लावण्यात आलेल्या टॉरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) रुपया घसरत आहे. टॉरिफमुळे व्यापारावर परिणाम झाला असून परदेशी गुंतवणूकदारांच्या भावना मंदावल्या आहेत. माहितीनुसार 2025 मध्ये आतापर्यंत 18 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय इक्विटी परदेशी गुंतवणूकदारांनी विकल्या आहेत. व्यापाऱ्यांनी सांगितले की NDF पोझिशन्सच्या परिपक्वतेमुळे अल्पकालीन डॉलरची मागणी वाढली, ज्यामुळे रुपयावर (Dollar Rate In India) दबाव आला.
IND vs SA: अक्षर पटेल मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला दोन वर्षांनंतर भारतीय संघात पुन्हा संधी
आशियाई चलनांमध्ये सर्वात वाईट कामगिरी
गेल्या आठवड्यात शुक्रवारी रुपया 17 पैशांनी घसरून 90.49 वर बंद झाल्यानंतर ही नवीनतम घसरण झाली आहे, जी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतची सर्वात कमी पातळी आहे. भारतीय रुपया आज आणखी एका विक्रमी नीचांकावर घसरला, ज्यामुळे तो आशियाई चलनांमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा चलन बनला. अपेक्षेपेक्षा चांगला व्यापार शिल्लक डेटा असूनही, रुपया सावरण्यात अपयशी ठरला.
