13-14 जागा मिळवतानाच माझ्या नाकीनऊ, मी कशाला..; सांगलीच्या जागेवरून होणाऱ्या आरोपांवर जयंत पाटील काय म्हणाले?

13-14 जागा मिळवतानाच माझ्या नाकीनऊ, मी कशाला..; सांगलीच्या जागेवरून होणाऱ्या आरोपांवर जयंत पाटील काय म्हणाले?

Jayant Patil Sangali Speech : सांगली लोकसभेसाठी (Sangli Lok Sabha) उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी उमेदवारी दिली. त्यामुळं कॉंग्रेसकडून ही लोकसभा लढण्याची इच्छा बाळगून असलेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, सांगलीची जागा ठाकरे गटाकडे जाण्यासाठी जयंत पाटीलच (Jayant Patil) कारणीभूत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. त्यावर आता जयंत पाटलांनी भाष्य केलं.

13-14 जागा मिळवतानाच माझ्या नाकीनऊ, मी कशाला..; सांगलीच्या जागेवरून होणाऱ्या आरोपांवर जयंत पाटील काय म्हणाले? 

चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सांगलीत सभा झाला. या सभेला कॉंग्रेस नेते विश्वजित कदम, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, महाविकास आघाडीचे उमदेवार चंद्रहार पाटील, मिलिंद नार्वेकर आदि नेते उपस्थित होते. या सभेला संबोधित करतांना पाटील म्हणाले की, लोकांना असं वाटतं की, मीच उद्धव ठाकरेंना सांगलीत उमेदवार दिला. आणि सांगलीची जागा कॉंग्रेसकडे न जाऊ देता तुम्हीच घ्या, असं ठाकरेंना सांगितलं. पण, मी असं कशाला करू. मला माझ्या तेरा-चौदा जागा पाहिजे होत्या. त्याच तेरा-चौदा जागा मिळवतांना माझ्या नाकीनऊ आल्याचं पाटील म्हणाले.

Lok Sabha Election : सुजय विखेंना पाठिंबा देणारे उपनेते विजय औटी शिवसेनेतून निलंबित 

ते म्हणाले, आम्ही अनेक जागा सोडल्या. ईशान्य मुंबईची जागा आम्हाला लढवायची होती. पण, संजय राऊतांनी ती जागा ठाकरेकडे घेतली. आम्ही भंडारा, अमरावती जागा लढणार होता. कारण, नवनीत राणांना आम्ही पाठिंबा दिला. पण, निवडून आल्यावर तिसऱ्या दिवशी भाजपच्या दारात गेल्या. अपक्षांना निवडून देणं फार धोक्याचं असतं. कारण, ते कधी कुठं जातील काही सांगता येत नाही,असं पाटील म्हणाले.

पुढं बोलतांना ते म्हणाले, कोणाची तरी या मतदारसंघातून लोकसभा लढायची इच्छा होती, पण ती मान्य झाली नाही. त्यामुळं आपण आपली लढाईची दिशा बदलू शकत नाही. आपण एकसंघपणे चंद्रहार पाटलांच्या मशालीचं काम करायला पाहिजे. भाजपला पराभूत करण्यासाठी आता मशीलीचं काम करावं लागेल. माझ्या सोबत आणि माझ्या पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचं काम केलं पाहिजे, दुसरं इकडं – तिकडं केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहिल, असं पाटील म्हणाले.

देशातील सामान्य माणूस आज भाजपच्या विरोधात आहेत. लोकांच्या मनात भाजपविषयी रागाची भावना आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रात फिरत आहे, या दोन्ही नेत्यांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे. मराठी माणसांनी तयार केलेले दोन पक्ष फोडण्याचं प्रायश्चित भारतीय जनता पक्षाला मतदार या निवडणूकीत देतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रहार पाटील काय म्हणाले?
विशाल पाटील हे भाजपचं मोठं पाकीट घेऊन शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपची बी टीम म्हणून काम करत असताना आणि संजयकाका पाटलांची हॅट्रिक करून देण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर तुमचीही पराभवाची हॅट्रिक होईल, हे तुमच्या लक्षात कसं आलं नाही?, असं चंद्रहार पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज