Video : राज ठाकरेंच्या उत्तराने गुगली; सर्वपक्षीय नेत्यांचा ECI ला दोन ते तीन दिवसांचा अवधी; पत्रकार परिषदेत काय घडलं?

महाराष्ट्र निवडणूक आयोगाशी भेट घेतल्यानंतर मविआसह मनसे शिष्टमंडळाने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह

  • Written By: Published:
 Jayant Patil On Election Commission

 Jayant Patil On Election Commission : महाराष्ट्र निवडणूक आयोगाशी भेट घेतल्यानंतर मविआसह मनसे शिष्टमंडळाने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आम्ही निवडणूक आयोगाला मतदार यादीमधील घोळ दाखवून दिले असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. तसेच राज ठाकरे यांनी अनेक गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केले. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बाळासाहेब थोरात आणि इतर महाविकास आघाडीचे नेते उपस्थितीत होते.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जयंत पाटील म्हणाले की आम्ही निवडणूक आयोगाला एक निवेदन दिले आहे. आम्ही मतदार यादीमध्ये घोळ असल्याचे अनेक पुरावे निवडणूक आयोगाला दिले. अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये घोळ आहे. मुरबाड मतदारसंघात एकाच घरात 400 मतदारांची नोंद असल्याचा दावा देखील  या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी केला. तसेच सुषमा गुप्ता यांचं नाव अनेक ठिकाणी मतदार यादीत दिसून आला आहे. तर अनेक ठिकाणी  दुबार मतदार,घर क्रमांक नाहीत मात्र  आम्ही निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात आली असा दावा देखील जयंत पाटील यांनी यावेळी केला.

घोळ असलेली यादीच पुन्हा मतदानासाठी जाणार आहे का

तर दुसरीकडे या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील गंभीर आरोप करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.  या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब थोरात म्हणाले की विधानसभेच्या याद्यांमध्ये प्रचंड घोळ होता. आम्ही वारंवार सांगूनही याचे उत्तर दिलं नाही. वीस हजार मतदार बाहेरून आणल्याचं सत्तेतील आमदाराच सांगतात. घोळ असलेली यादीच पुन्हा मतदानासाठी जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आमचा समाधान झालेला नाही असं म्हटले आहे.

घोळ दुरुस्त होईपर्यंत निवडणुका नको : राज ठाकरे 

काल केंद्रीय निवडणुकीच्या आयोगाच्या प्रतिनिधी भेटलो तर आज दोन्ही निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो.  निवडणूक म्हटलं की राजकीय पक्ष येतात आणि मतदार देखील येतात. निवडणूक आयोग फक्त निवडूक घेतात. निवडणूक आयोग जर मतदार यादी दाखवत नसेल तर पहिला घोळ येथेच आहे. 117 आणि 124 वय असल्याचा मतदार यादीमध्ये उल्लेख. याद्यांमधून कोण कोणाचं वडील हे समजत नाही. याद्या सुधारित होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नये असं आमचं मत मांडलं. मतदार यादी मधील घोळ दुरुस्त होईपर्यंत निवडणुका नको. उद्या या विषयाचे निर्णय निवडणूक आयोग देणार आहे आणि त्यानंतर आम्ही सर्वपक्षीय विचार करून आमचे निर्णय सांगू असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले.

 इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा : उद्धव ठाकरे 

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहे. भाजपा पक्षातील कोणीही प्रतिनिधी आमच्यासोबत आले नाही. भाजपाचे कार्यकर्ते मतदार यादी सोबत खेळत आहेत. मतदार यादीत एका व्यक्तीचे नाव 4-4 ठिकाणी आहे जर असं असेल तर निवडणूक आयोगाने इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हावे असा टोला उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाला लावला.

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं दहा वर्षांनंतर स्टार प्रवाहवर दमदार पुनरागमन

तर दुसरीकडे आजच्या या पत्रकार परिसदेमध्ये राज ठाकरे देखील उपस्थित असल्याने राज ठाकरे आगामी निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे मात्र पत्रकार परिषदेच्या शेवटी बोलताना निवडणूक कोण कुणासोबत लढवणार हे महत्वाचे नाही असं राज ठाकरे यांनी म्हटल्याने राज ठाकरे आगामी निवडणुकांमध्ये कुणासोबत युती करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

follow us