तुम्ही तर रक्ताचे होतात ना? तरीही बाळासाहेबांसोबत असं का केलं?, भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार

तुम्ही तर रक्ताचे होतात ना? तरीही बाळासाहेबांसोबत असं का केलं?, भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार

Chhagan Bhujbal on Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) निमित्ताने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीचे नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र आता महायुतीच्याच (Mahayuti) दोन बड्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

मोठी बातमी ! घाटकोपर होर्डींग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई 

बाळासाहेबांना सोडून जाणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कसे काय बसला होता, असा सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचाला होता. राज यांच्या या वक्तव्यावर बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही हा प्रश्न विचारला पाहिजे की, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, असं तुम्ही म्हणता. मग तरीही तुम्ही भुजबळांच्या मांडीला मांडी लावून कसे काय बसला आहात? माझ्याबद्दल ही सगळी मंडळी बोलतात. मी एक शिवसैनिक असेल, कदाचित फार कट्टर नव्हतो, असंही समजून चला. अरे पण, तुम्ही तर रक्ताचे आहात ना? असा खोचक सवाल भुजबळांनी केला आहे.

पुणेकरांनो, स्वस्त घर खरीदीचे स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाने केली मोठी घोषणा 

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, राज शाळेतून आला नाही, म्हणून अनेकदा मातोश्रीवर लोक जेवत नव्हते. असं असतांना तुम्ही का केलं असं बाळासाहेबांसोबत? तुम्ही तर इकडेपण असता, तिकडे पण असता. चला जाऊ द्या, माझ्या दृष्टीने हा मुद्दा संपला आहे. कारण, लोकांनाही हा मुद्दा फारसा भावला, असं काही नाही. मी जसं उद्धव ठाकरेंसोबत बसलो होतो, तसं आता एकनाथ शिंदेंबरोबरही बसलो आहे, अशा शब्दात भुजबळांना आपली भूमिका मांडली.

राज ठाकरे काय म्हणाले होते?
काही दिवसांपूर्वी कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कळवा येथे राज ठाकरेंची सभा झाली. या सभेत बोलतांना राज ठाकरेंनी पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.
उद्धव ठाकरेंनी मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक खोके देऊन फोडले. तेव्हा त्यांना काही नाही वाटले. त्यांच्यासोबत शरद पवार बसले आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाची कुणी सुरूवात केली असेल तर शरद पवारांनी केली. त्यांनी आधी कॉंग्रेस फोडली आणि मग पुलोद स्थापन केलं. 1991 मध्ये पुन्हा छगन भुजबळांचा फितवून पवारांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली होती. बाळासाहेबांना सोडून जाणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कसे काय बसला होता? अशी टीका राज ठाकरेंनी केली.

दरम्यान, तुम्ही तर रक्ताचे होता, तरीही तुम्ही बाळासाहेबांसोबत असं का वागलात या भुजबळांच्या प्रतिक्रियेवर आता राज ठाकरे यावर काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज