मोठी बातमी ! घाटकोपर होर्डींग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

मोठी बातमी ! घाटकोपर होर्डींग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Bhavesh Bhinde arrested : दोन दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर एक अवाढव्या बेकायदेशीर होर्डींग कोसळल्याने 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या 16 जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde ) याला आता मुंबई पोलिसांनी अटक केली.

मोठी बातमी ! घाटकोपर होर्डींग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई 

घाटकोपर दुर्घघटनेतील आरोपी भावेश प्रभुदास भिंडे (51) हा अटकेच्या भीतीने पळून गेला होता. मुंबई पोलिसांचे एक पथक त्याच्या मुलुंड येथील घरी पोहोचले होते. मात्र तो पसार झाला होता. पोलिसांना त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळा असल्याचं समजलं होतं. त्यानुसार मुंबई पोलिसांचे सात पथक लोणावळ्याला पोहोचले. मात्र त्यापूर्वीच भिंडेने मोबाईल बंद केला. तेव्हापासून तो बेपत्ता होता. पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, भावेश भिंडे याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे, त्याला उदयपूर येथून अटक करण्यात आली. भावेश भिंडेने भाच्याच्या नावाने उदयपूरमध्ये रूम बुक केली होती. तिथे तो राहत होता. आता त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावं, अजित पवार गटाचा टोला 

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 75 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भिंडेने 2009 ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यावेळी महापालिकेची परवानगी न घेता बॅनर लावल्याप्रकरणी त्याच्यावर 21 वेळा कारवाई करण्यात आली होती. याशिवाय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टनुसार त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. २४ जानेवारी रोजी मुलुंड पोलिस ठाण्यात भिंडे याच्याविरुद्ध बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हाही दाखल आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज