पृथ्वीराज चव्हाणांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावं, अजित पवार गटाचा टोला

पृथ्वीराज चव्हाणांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावं, अजित पवार गटाचा टोला

Ajit Pawar NCP on Prithviraj Chavan :  राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) चार टप्पे पार पडले. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) महायुतीपेक्षा जास्त जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हा (Prithviraj Chavan) यांनीही महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील तर महायुतीला 15 ते 16 जागा मिळतील, अजित पवार गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही, असा दावा केला. त्यावर आता अजित पवार गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं.

सनी लिओनीचे कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मधील हटके लूक; चाहते झाले घायाळ 

चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावं, निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील, असा टोला अजित पवार गटाने लगावला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आज माध्ममांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्याविषयी विचारले असता पाटील म्हणाले की, राज्यात निवडमुकीतचे सर्व टप्पे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळं अशी भविष्यवाणी करून पुढच्या मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातो. पवार साहेबांनी अशीच भविष्यवाणी केली. पण, पवार साहेबांकडे दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणार नाही. पृथ्वीराज चव्हाण हे फक्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. म्हणून त्यांना टीव्हीवर काही प्रमाणात टीआरपी मिळतो. पण, त्यांना राज्यासंदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राजकारणावर भाष्य करावं एवढी त्यांची उंचा नाही, अशी टीका पाटील यांनी केली.

हंसल मेहता उघडणार नव्या घोटाळ्याची फाईल, ‘स्कॅम २०१०: द सुब्रत रॉय सागा’ वेब सीरिजची केली घोषणा 

अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार की नाही हे मतदार ठरवतील, असेही ते म्हणाले. 4 जून रोजी त्याचा निकाल येईल. अहो अजित पवारांच्या पाठीशी 40-50 आमदार आहेत. पण पृथ्वीराज चव्हाण, तुमच्यासोबत किती आमदार आहेत? काँग्रेसचा एकही आमदार त्यांच्यापाठीशी नाही, त्यामुळे प्रसारमाध्यमांनीही पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा किती गांभीर्याने विचार करावा, असा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी एकतर पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावं. निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील, असा टोला पाटील यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाष्य करण्याच्या फंदात पडू नका, आपली सार्वजनिक जीवनातील पत किती आहे, हे तपासून पाहा, अशी टीकाही पाटील यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज