संशयकल्लोळ थांबवा अन् गोडसेंना निवडून द्या; छगन भुजबळांची नाशिककरांना साद

संशयकल्लोळ थांबवा अन् गोडसेंना निवडून द्या; छगन भुजबळांची नाशिककरांना साद

Nashik Loksabha : आपापसांतल्या अडचणींवरुन सुरु असलेला संशयकल्लोळ थांबवा अन् हेमंत गोडसे (Hemant godse) यांना निवडून द्या, या शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी नाशिककरांना साद घातलीयं. दरम्यान, नाशिक लोकसभेवरुन गोडसे आणि भुजबळ यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावर मी नाराज नसल्याचं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलं होतं. आता महायुतीच्या सभेतून हेमंत गोडसेंसाठी छगन भुजबळांनी मतदारांना साद घातलीयं.

मोठी बातमी : मोदी सरकराला SC चा झटका; NewsClick चे संस्थापक पुरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर

छगन भुजबळ म्हणाले, आपापसांत अनेक अडचणी असतात, त्याच्यावरुन एकमेकांवर संशय घेऊ नका. हा संशयकल्लोळ थांबवा अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उमदेवार हेमंत गोडसे यांना निवडून द्या. कोणी काहीही म्हणेल, रोज नवीन नवीन गोष्टी समोर येतील. लोकं गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील, नाराज करतील पण ही लढाई आपल्याला लढवय्यासारखी लढायची असल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

ये पब्लिक है, सब जानती है! शिवसेनेच्या 15 जागा निवडून येणार; मुख्यमंत्र्यांचा दावा

तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघातून भारती पवार यांनाच निवडून द्या. कारण जगभरात भारताची प्रतिभा वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले सर्वच निर्णय यशस्वी ठरले आहेत. जगात मोदींनी भारताचं नावलौकिक वाढवलं आहे. देशातील जनतेला विविध योजनांचा फायदा मोदींमुळेच झाला आहे. यामध्ये जलजीवन, विश्वकर्मा, पंतप्रधान आवास, आयुष्यमान भारत अशा अनेक
योजनांच्या माध्यमातून मोदींनी जनतेची सेवा केली असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात देशातील जनतेला मोफत अन्नधान्य दिलं मात्र कोरोना काळ संपल्यानंतर अद्यापही मोदी लोकांना मोफत अन्नधान्य देत आहेत. मी त्या खात्याचा मंत्री आहे. देशातल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारसह राज्य सरकारने पैसे दिले असून नाशिक ही कृषीभूमी आहे. नाशिकात पिकत असलेला शेतीमाल मुंबईत जात असल्याचाही उल्लेख भुजबळांनी यावेळी केलायं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी नाशिक मतदारसंघावर दावा केला होता. त्यामुळे महायुतीमध्ये या जागेवरून तिढा निर्माण झाला होता. मात्र आता मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून माघार घेतल्याची घोषणा केली. या जागेवरून महायुतीमध्ये तणाव निर्माण होऊ नये, तसेच प्रचारात विरोधकांना आघाडी मिळू नये, यामुळे मी हा निर्णय घेत असल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज