आता इस्लामपूर नाही तर, ईश्वरपूर म्हणायचं; भुजबळांच्या नामकरण घोषणेला केंद्राची मंजुरी
लोकभावनांचा सन्मान करणाऱ्या आपल्या मोदी सरकारने सांगलीमधील इस्लामपूर शहराचं नाव बदलण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.
Islampur Now Became Ishwarpur Central Government Approves New Name : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर असे करण्यात आले आहे. केंद्र सरकारने (Modi Government) या नामकरणाला मान्यता दिली आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मंजुरी पत्र प्राप्त झाले आहे. राज्य सरकारने इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर केले होते. या नामकरणाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता ईश्वरपूर असे इस्लापूरचे अधिकृत नाव असणार आहे.
Piyush Pandey : ‘अब की बार मोदी सरकार’ लिहिणारे जाहिरात जगतातील जादूगार पियुष पांडे यांचे निधन
भुजबळांनी केली होती घोषणा
पावसाळी अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी इस्लापूरचे नाव ईश्वरपूर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता भुजबळांच्या या घोषणेला केंद्र सरकरने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या नामकरणाला दिलेल्या मंजुरीने प्रथम ईस्लापूर शहराचे नाव ईश्वर करण्यात येईल. त्यानंतर ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ असे नामकरण करण्यात येईल. याबाबत भाजप नेते रवींद्र चव्हण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर केंद्राच्या मंजुरीचे पत्र पोस्ट करत निर्णय हिंदू अस्मितेचा, ऐतिहासिक वारसा जपणारा! असे म्हटले आहे.
नाव का बदलले?
गेल्या ४०-५० वर्षांपासून इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी काही दशकांपूर्वी शहराचे नाव ईश्वरपूर करण्याची मागणी केली होती. शिवाय, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डिसेंबर १९८६ मध्ये इस्लामपूरमधील यल्लमा चौकात झालेल्या मेळाव्यात पहिल्यांदाच शहराचा जाहीरपणे ईश्वरपूर असा उल्लेख केला होता. त्यानंतर आता मोदी सरकारनेही या नामकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शहराचे नाव ईश्वरपूर असे संबोधले जाणार आहे. Islampur Now Became Ishwarpur Central Government Approves New Name
राजीनाम्यानंतर भाजपशी जवळीक, फाळके- शिंदे भेटीमागे नवे राजकीय समीकरण?
या बदलाचा परिणाम सर्व सरकारी आणि निमसरकारी संस्थांवर होईल. ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ आणि इतर सरकारी स्तरावरील संस्थांमधील सर्व कागदपत्रे, संस्था आणि उद्योगांमध्ये हे नवीन नाव वापरले जाईल.शहरवासीयांच्या दीर्घकाळाच्या इच्छेचा आदर करून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे आणि स्थानिक लोकांमध्ये याबद्दल आनंदाचे वातावरण आहे.
