‘उरुण इस्लामपूर’चे ऐतिहासिक नाव धोक्यात; शहरवासियांचे साखळी उपोषण, जयंत पाटलांचे राज्यपालांना निवेदन

Jayant Patil Letter To Governor On Urun Islampur : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या ‘उरुण इस्लामपूर’ शहराच्या नामांतराच्या (Urun Islampur Name Changed) प्रस्तावासंदर्भात उरुण वासियांनी सक्रिय भूमिका घेतली आहे. राज्य शासनाने शहराचे नाव ‘ईश्वरपूर’ करण्याची घोषणा पावसाळी अधिवेशनात केली असून, हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावात ‘उरुण’ हा ऐतिहासिक शब्द वगळण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज मा. राज्यपाल (Governor) सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिले.
नामकरणाचा प्रस्ताव
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचे नाव ‘ईश्वरपूर’ करण्याची घोषणा शासनाने पावसाळी अधिवेशनात केली आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठीही पाठविण्यात आला आहे. मात्र नामकरणाच्या या प्रस्तावात ‘उरुण’ शब्द वगळलेला आहे.
' उरूण इस्लामपूर' शहराच्या नामांतरातून 'उरुण' शब्द वगळण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने आज मा.राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिले.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचे नाव 'ईश्वरपूर' करण्याची घोषणा शासनाने… pic.twitter.com/ULyDCOPXuX
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 17, 2025
बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक घटना; महिला सरपंचाला अश्लील भाषेत शिवीगाळ
उरुण हा ऐतिहासिक परंपरा असलेला भाग आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून याचा उल्लेख आढळतो. तर सोळाव्या शतकांनतर इस्लामपूरचा उल्लेख आढळतो. यामुळे या शहरांला “उरुण-इस्लामपूर” अशीच ओळख असून शहराने सामाजिक सलोखा जपला आहे. राज्य शासनाने प्रस्तावित केल्याप्रमाणे केंद्र सरकारने प्रस्ताव मंजूर केला तर “उरुणचे” अस्तित्वच नष्ट होईल.
आपल्या आई, बहीण, मुलींचे CCTV फुटेज देऊ? निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांचा राहुल गांधींवर संताप
साखळी उपोषण सुरू
‘उरुण इस्लामपूर’ शहराच्या नामांतराच्या प्रस्तावात उरुण नावाचा समावेश करुन प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याची उरुण वासियांची आग्रहाची मागणी असून त्यासाठी ते दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून साखळी उपोषण करीत आहेत. या उपोषणस्थळी शासनाच्या विविध मंत्री महोदयांनी भेटी देवून आश्वासने दिली आहेत. परंतु, राज्य मंत्रीमंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणून उरुन वासियांच्या शिष्टमंडळासोबत राज्यपाल महोदयांची भेट घेऊन उरुण वासियांची मागणी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. राज्यपाल महोदयांनी याबाबत सकारात्मक भुमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना याबाबत सूचना करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे.