मोदी सरकार आणणार नवीन योजना, ‘या’ लोकांचा होणार बंपर फायदा, जाणून घ्या सर्वकाही…

मोदी सरकार आणणार नवीन योजना, ‘या’ लोकांचा होणार बंपर फायदा, जाणून घ्या सर्वकाही…

UPS Scheme :  देशातील नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी आज केंद्र सरकारकडून (Central Government) अनेक योजना राबविण्यात येत आहे. ज्याचा देशातील एकाच वेळी लाखो लोकांना फायदा मिळत आहे. तर आता पुन्हा एकदा केंद्र सरकार एक नवीन योजना लागू करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेकांना दरमहा पेन्शनची हमी सरकारकडून मिळणार आहे. केंद्र सरकार 1 एप्रिलपासून युनिफाइड पेन्शन योजना (Unified Pension Scheme) म्हणजेच यूपीएस (UPS Scheme) ही नवीन योजना लागू करण्याची तयारी करत आहे. या योजनेत 30 जून 2025 पर्यंत सहभागी होता येणार आहे मात्र ही योजना फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी असणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांना पेन्शनची हमी

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, युनिफाइड पेन्शन योजनेत 25 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या पगाराच्या सरासरीच्या 50 टक्के पेन्शन हमी मिळणार आहे. तर दुसरीकडे जर एखाद्या कर्मचाऱ्याने 10 वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण केली असेल तर त्याला दरमहा किमान 10,000 रुपये पेन्शन मिळणार. याच बरोबर कोणत्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला शेवटच्या पेन्शन रकमेच्या 60 टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

यूपीएस योजना काम कशी करणार ?

केंद्र सरकारने 2004 मध्ये ओल्ड पेन्शन योजना बंद करून राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली होती. सुरुवातीला ही योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती मात्र 2009 मध्ये ही योजना सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात आली होती. याअंतर्गत आता युनिफाइड पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक निश्चित रक्कम कापली जाते आणि ती बाजार आधारित गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवली जाते. निवृत्तीच्या वेळी, 60 टक्के रक्कम एकरकमी मिळते, तर 40 टक्के रक्कम गुंतवावी लागते, जी दरमहा पेन्शनच्या स्वरूपात मिळते.

योजनेच्या अटी आणि शर्ती

केंद्र सरकारकडून यूपीएस योजनेअंतर्गत निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्यांत मिळालेल्या सरासरी मूळ पगाराच्या 50 टक्के रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्यात येणार आहे. या योजनेत नावनोंदणी करण्याचा पर्याय 1 एप्रिल 2025 पासून तीन महिन्यांच्या आत असणार आहे. तसेच तुम्ही या योजनेत निवडलेला पर्याय अंतिम मानला जाणार आहे. एकदा निवडलेला पर्याय रद्द करता येणार नाही.

यूपीएस नोंदणीसाठी पात्र कर्मचारी

1 एप्रिल 2025 रोजी सेवेत असलेले आणि आधीच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) अंतर्गत येणारे विद्यमान केंद्र सरकारी कर्मचारी.

1 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारी सेवेत रुजू झालेले नवीन भरती झालेले कर्मचारी.

केंद्र सरकारचे असे कर्मचारी जे एनपीएस अंतर्गत होते परंतु 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झाले. याशिवाय, निवृत्त कर्मचारी देखील व्हीआरएस अंतर्गत लाभ घेऊ शकतील.

भाविकांसाठी गुडन्यूज! त्र्यंबकेश्वर देवस्थानला तिर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सर्व श्रेणींसाठी नोंदणी आणि दाव्याचे फॉर्म 1 एप्रिल 2025 पासून प्रोटीन सीआरए वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध असतील. कर्मचाऱ्यांना फॉर्म प्रत्यक्ष सादर करण्याचा पर्याय देखील आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube