भाविकांसाठी गुडन्यूज! त्र्यंबकेश्वर देवस्थानला तिर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

भाविकांसाठी गुडन्यूज! त्र्यंबकेश्वर देवस्थानला तिर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा,  राज्य सरकारचा मोठा निर्णय

Trimbakeshwar Devasthan Declared A Class Pilgrimage : नाशिककर आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत (Trimbakeshwar Devasthan) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला तिर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देण्यात आलाय. त्यामुळे भाविकांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे आता देवस्थानच्या विकास आराखड्याला गती मिळणार (Mahayuti Government) आहे. तसेच भाविकांना मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा देखील आता मिळणार आहे.

नुकतंच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानला पाहणी केली होती. सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर ते नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कुंभमेळ्याच्या जागेची पाहणी केली होती. सोबतच त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विकासासाठी (Sihnastha Kumbhmela) निधी देखील जाहीर केला होता. प्रयागराजमध्ये महाकुंभ पार पडला. त्यानंतर आता नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळाच्या तयारी जोरदार सुरू आहे.

‘…समाधानी नाही’, आरोपींनी खुनाची कबुली दिल्यानंतर संतोष देशमुखांच्या भावाची प्रतिक्रिया समोर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेतले होते. यावेळी, फडणवीसांनी तिर्थक्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्या होत्या. आता शासनाकडून त्र्यंबकेश्वर मंदिराला अ वर्ग दर्जा जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. मागील अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात होती. अखेर कुंभमेळ्यापूर्वी राज्य शासनाने हा महत्वाचा निर्णय घेतलाय.

चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर २१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर! चंद्रकांत कुलकर्णींच्या नाटकातून पुनरागमन

नगर विकास खात्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र ‘अ’ दर्जा देण्यास मंजुरी दिलीय. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थस्थान आहे. महाशिवरात्री, श्रावण महिन्यातील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा या वेगवेगळ्या कारणांनी तिथे बाराही महिने भाविकांची गर्दी असते. यासंदर्भात जानेवारी महिन्यामध्ये विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानंतर या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. आता अ दर्जा मिळाल्याने भाविकांनी आणि मंदिर प्रशासनाला देखील मोठा फायदा होणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube