Nashik News : नाशिक पोलिसांनी नंबर दिला मदतीसाठी.. पण प्रत्यक्षात काय घडलं?
Nashik News : नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीचा आलेख वाढत (Nashik News) चालला आहे. राज्यभरात गाजलेलं ललित पाटील ड्रग्ज प्रकरण. तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नदीत सापडलेलं कोट्यावधींचं ड्रग्ज. बंद पडलेल्या कारखान्यांची तपासणी अशा अनेक घटना चर्चेत राहिल्या. एकूणच नाशिक शहरातील गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली. या मोहिमेत नागरिकांचंही सहकार्य मिळालं तर बरं असा विचार करून एक व्हॉट्सअप नंबर (9923323311) जारी केला. या नंबरवर लोक काही महत्वाची माहिती, सूचना आणि अभिप्राय देतील अशी अपेक्षा पोलिसांना होती. प्रत्यक्षात मात्र या नंबरवर लोकांनी शुभेच्छा संदेशांचा वर्षावच केला. या नंबरवर दीड दिवसांत प्राप्त झालेल्या एकूण 236 संदेशांमध्ये तब्बल 60.59 टक्के संदेश फक्त शुभेच्छा देणारेच होते.
दिड दिवसात तुमच्याकडून पोलीस आयुक्त व्हॉट्सॲप क्रमांक 99 233 233 11 यावर २३६ संदेश प्राप्त झाले.
🟢 शुभेच्छा – ६०.५९% 😀🙏
🟢 वाहतूक – १४.८३%
🟢 पोलीस स्टेशन संबंधित – १२.७१%
🟢 ड्रग्स – २.१२%
🟢 महिला सुरक्षा – १.२७%
🟢 ध्वनी प्रदूषण – ०.८५%
🟢 गस्त घालणे – ०.८५%
🟢 रस्त्यावर… pic.twitter.com/fGU4a2W0J3— नाशिक शहर पोलीस – Nashik City Police (@nashikpolice) December 29, 2023
सीपी नाशिक सिटी कंट्रोल रुममध्ये व्हॉट्सअप नंबरवर प्राप्त झालेल्या या संदेशांची माहिती घेण्यात आली. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली. या संदेशांमध्ये शुभेच्छा देणाऱ्या संदेशांचे प्रमाण निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच तब्बल 60.59 टक्के होते. तसेच वाहतुकीशी संबंधित संदेशांचे प्रमाण 14.83 टक्के होते. पोलीस स्टेशन संबंधित मेसेज 12.71 टक्के होते. ड्रग्स संबंधित मेसेज फक्त 2.12 टक्के होते. महिला सुरक्षेशी संबंधित मेसेजेसचे प्रमाण 1.27 टक्के होते. ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींचे प्रमाण 0.85 टक्के इतके कमी होते. गस्त घालणे 0.85 टक्के, रस्त्यावर उपद्रव 0.42 टक्के आणि अन्य प्रकारचे मेसेज 6.36 टक्के इतके होते.
Nashik-Pune Railway : नाशिक-पुणे रेल्वेला लालफितीचा ब्रेक? दानवे म्हणतात, याला जबाबदार..
ही आकडेवारी समोर आल्यानंतर पोलिसांनीही (Nashik Police) डोक्याला हात लावला. पोलिसांना पुन्हा आवाहन करणे भाग पडले आहे. पोलिसांनी सांगितले आहे की हा व्हॉट्सअप क्रमांक फक्त सूचना, इनपूट आणि अभिप्राय कळवण्यासाठी आहे. त्यामुळे हा नंबर इमर्जन्सी रिस्पॉन्स नंबर म्हणून वापरला जाऊ नये. आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी नेहमी #112 हा नंबरच डायल करा, असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे. आता पोलिसांच्या या आवाहनानंतर तरी लोकांच्या डोक्यात प्रकाश पडणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.