Nashik News : नाशिकमध्ये एकाच वेळी 2 बिबटे; शर्थीच्या प्रयत्नांनंतर दोन्ही बिबटे जेरबंद

Nashik News : नाशिकमध्ये एकाच वेळी 2 बिबटे; शर्थीच्या प्रयत्नांनंतर दोन्ही बिबटे जेरबंद

Nashik News : बिबट्या समोर दिसताच भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. दरदरून घाम फुटतो. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांनी जीवही गमावला आहे. त्यामुळे हा हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. परंतु, तरीही बिबट्या मानवी वस्तीत येण्याच्या घटना वाढल्या आहेत. आताही नाशिक शहरात (Nashik News) दोन बिबटे घुसल्याने (Leopard in Nashik) मोठी खळबळ उडाली. भल्या पहाटेच शहरातील सावतानगर भागात बिबट्याचे दर्शन झाले. मोठ्या प्रयासाने या बिबट्याला जेरबंद केले. त्यानंतर लगेचच दुसरा बिबट्या गोविंनगरातील घरातच घुसला. या प्रकाराने परिसरातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली. बिबट्यांच्या संचाराचा हा थरार नाशिककरांनी डोळ्यांनी पाहिला.

नगरमध्ये बिबट्याचा संचार; जेरबंद करण्यासाठी वन विभागाची करडी नजर

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात अनेक दिवसांपासून बिबट्या धुमाकूळ घालत आहे. भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात हे बिबटे मानवी वस्तीत येत आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शहरातील सावतानगर भागात बिबट्या दिसला. परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर या बिबट्याला पकडले. यानंतर भयभीत झालेल्या नागरिकांना हायसे वाटले. परंतु, तेवढ्यात दुसरा बिबट्या गोविंदनगर भागात येऊन धडकल्याची माहिती मिळाली. हा बिबट्या थेट घरातच घुसला. बिबट्याच्या दहशतीने नागरिक चांगलेच घाबरले. अरुंद गल्ली बोळा असल्याने बिबट्यालाही बाहेर पडता येईना. एका जागरूक डॉक्टराने घर बंद केले आणि हा बिबट्या घरातच अडकला. आता या बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने दाखल झाले. बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. यानंतर पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी कार्यवाही सुरू केली. परंतु, येथे जमा झालेल्या लोकांतील बरेच जण सेल्फी आणि मोबाइलमध्ये फोटो, व्हिडिओ काढण्यात गुंतले होते.  त्यामुळे पथकाला अडचणी येत होत्या. नागरिकांनी येथे गर्दी करू नये, अशा सूचना वनविभागाकडून दिल्या जात होत्या. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

बिबट्या आला अन् लोक पळतच सुटले 

बिबट्या शहरात घुसल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. अचानक हा बिबट्या माणसं  उभी आहेत त्या ठिकाणी चाल करून जात आहे. बिबट्या येत असल्याचे पाहून मात्र येथे एकच पळापळ सुरू होते. या धावपळीत बिबट्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत शिरताना दिसत आहे.

Goregaon: गोरेगावच्या फिल्मसिटीत घुसला बिबट्या, Video Viral

त्यांनी खोली बंद केली अन् अनर्थ टळला 

गोविंदनगरमधील अशोका प्राईड इमारतीच्या तळ मजल्यावर वास्तव्यास असणारे डॉ. सुशील अहिरे यांच्या सतर्कतेमुळे बिबट्याला एका घरात बंद करणे शक्य झाले. सकाळी ते कुत्र्याला घेऊन फिरायला गेले होते. घरी परतल्यानंतर कुत्रा अस्वस्थ झाला. जोरात भुंकू लागला. त्यानतंर अहिरे यांनी आपल्या घरातील एका खोलीची पाहणी केली असता त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी तत्काळ खोली बंद केली आणि वनविभागाला माहिती दिली. अहिरे यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube