‘…समाधानी नाही’, आरोपींनी खुनाची कबुली दिल्यानंतर संतोष देशमुखांच्या भावाची प्रतिक्रिया समोर

Dhananjay Deshmukh On Sudarshan Ghule Confessed Santosh Deshmukh Murder : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाला जवळपास चार महिने उलटलेत. याप्रकरणी काल बीड जिल्हा अन् सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. याप्रकरणी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली (Santosh Deshmukh Murder) दिलीय. त्यांनी अपहरण करून हत्या केल्याचं कबुल केलंय. त्यानंतर स्कॉर्पिओ गाडीच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सुदर्शन घुले याच्या हाताचे ठसे असल्याचं देखील स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची (Dhananjay Deshmukh) पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
धनंजय देशमुख यांनी म्हटलंय की, तपास सपूर्ण झाला आहे. सुनावणीदरम्यान सगळं पुढे येणार आहे. खंडणी ते खून प्रकरण एकच टोळी आहे. गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहे. आज दोघा-तिघांनी मान्य केलं असलं, तरी पुढे सगळे मान्य (Beed Crime News) करतील. न्यायालय समिती सरकारने स्थापन केली आहे, त्यातून सगळे पुढे येईल. पोलिसांना कळले होते तरी लवकर पोलीस गेले नाहीत, तिकडे कायदा सुव्यस्था पाहण्यात आली. आमची कुटुंबाची मोठी हानी, पोलिसांनी वेळेवर जाऊन अनार्य टाळले असते.
आता रांगेत उभं राहायची गरज नाही! मंत्रालयात मिळणार ऑनलाईन ॲपद्वारे प्रवेश, ‘अशी’ करा नोंदणी
जोपर्यंत फाशी होत नाही तोवर आमचे समाधान आणि प्रतिक्रिया देणं योग्य नाही. खंडणी, खून अपहरण ही टोळी संघटित आहे. मला व्हिडीओ-फोटो बाबतचा त्रास होतोय. या क्रूरकर्मी लोकांची कोणीही बाजू घेणार नाही. निकम साहेब आम्हाल न्याय देतील, असा विश्वास देखील धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलाय.
या घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकत होता. कृष्णा आंधळेवर अगोदर गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी त्याला कायद्याचा धाक दाखवला असता, तर त्याला अगोदर अटक झाली असती. आरोपी कृष्णा आंधळे सापडत नाही, याचं उत्तर आम्हाल दिले पाहिजे. आम्ही पण वाट पाहत आहोत. आरोपींनी चार महिन्यानंतर खूनाची कबुली दिली, परंतु तरी न्यायासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला, असं देखील धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलंय.