निवडून दिलं म्हणजे सगळे…, तपोवन वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंनी फडणवीस सरकारला सुनावलं

Sayaji Shinde On Tapovan Tree :  नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे.

  • Written By: Published:
Sayaji Shinde On Tapovan Tree

Sayaji Shinde On Tapovan Tree :  नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. नाशिकमधील तपोवनात साधुग्राम तयार करण्यासाठी परिसरातील काही झाडं तोडण्यात येणार असल्याने आता या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर पर्यावरण प्रेमी नाराज झाले असून त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. दुसरीकडे अभिनेता सयाजी शिंदे यांनी देखील या निर्णयाचा विरोध केल्याने काही जणांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होता दिसत आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सयाजी शिंदे यांच्या समर्थानात उतरले आहे. तर आता अजितदादांनी सपोर्ट केला तसा भाजपच्या काही लोकांनी देखील सपोर्ट केला असल्याचा खुलासा अभिनेता सयाजी शिंदे यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना अभिनेता सयाजी शिंदे (Sayaji Shinde) म्हणाले की, नाशिककरांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे आणि त्यामुळे मी नाशिकला गेलो होतो. नाशिकरांची भूमिका बघून आज सर्व अभिनेता, कवी, पर्यावरणप्रेमी, कॉमन मॅन हा झाडासाठी उभा राहिला आहे. पुर्नरोपण किंवा त्याच्या बदल्यात 10 झाडे लावायची ही निवड पळवाट आहे. यात खर्च खूप होणार आहे. उदाहरण, उजाड माळरानाच्या ठिकाणी झाडं लावली. तिथे झाडं नाहीत कराण तिथली माती चांगली नाही, तिथे कुंभ मेळावा भरवला पाहिजे असं अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले. तसेच निवडून दिलं म्हणजेच सगळे अधिकार तुमच्याकडे आहे असं काही नाही. सर्वसामान्य माणसाचा देखील विचार केला पाहिजे. या प्रकरणात लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे. मोठी झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूकीचे आहे. काही माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचं असं कुठे होतं का? असं अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले.

या प्रकरणात राजकारण करु नका. ज्याप्रमाणे अजितदादांनी (Ajit Pawar) मला सपोर्ट केला त्याप्रमाणे भाजपच्या (BJP) काही लोकांनी मला सपोर्ट केला आहे. 50 फूटी झाडं तोडायची आणि त्या बदल्यात नवी झाडं लावायची एवढी मोठी पळवाट शोधू नका. या प्रकरणात चुकीचा निर्णय होता कामा नये. सगळी झाडे जगली पाहिजेत असं देखील सयाजी शिंदे म्हणाले.

Virat Kohli : BCCI नाराज होताच किंग कोहलीचा मोठा निर्णय; ‘या’ स्पर्धेत खेळण्यास तयार

लोक काय बोलतात त्यांचं त्यांनाच धन्यवाद

तर दुसरीकडे या प्रकरणावरुन सयाजी शिंदे यांच्यावर गुणरत्न सदावर्तेंनी जोरदार टीक केली होती. आम्ही साधू-संतांचा अपमान सहन करणार नाही असं म्हटलं होते तर आता सयाजी शिंदे यांनी प्रत्युत्तर देत आपण आपले बरे आहोत तिथे खरे, बाकीचे लोक काय बोलतात त्यांचं त्यांनाच धन्यवाद. त्यांना त्याचं लखलाभ, मला त्याच्याबद्दल काही बोलयचं नाही असं म्हणत सयाजी शिंदे यांनी गुणरत्न सदावर्तेंना प्रतिउत्तर दिले.

follow us