मोठी बातमी : मोदी सरकराला SC चा झटका; NewsClick चे संस्थापक पुरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भाजप सरकारला झटका देत मोठा निर्णय जाहीर केला आहे. NewsClick चे संस्थापक आणि संपादक प्रबीर पुरकायस्थ ( Prabir Purakayastha ) यांची अटक आणि रिमांड बेकायदेशीर असल्याचे सांगून, त्यांची तात्काळ UAPA प्रकरणातून टका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर घटनात्मक मूल्ये जपण्यासाठी आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि न्यायालयाच्या वचनबद्धतेबद्दल आभारी असल्याचे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. (‘NewsClick’ Founder Prabir Purakayastha Arrest Under UAPA Is Invalid Says Supreme Court)
#BREAKING #SupremeCourt orders release of NewsClick founder & editor Prabir Purkayastha in UAPA case after holding that his arrest and remand were illegal.#NewsClick pic.twitter.com/BWWfK4maOl
— Live Law (@LiveLawIndia) May 15, 2024
दिल्ली पोलिसांनी पूरकायस्थ यांना न्यूज क्लिकमध्ये चिनी फंडिंगसह भारतविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. मात्र, रिमांड अर्जाची प्रत 4 ऑक्टोबर 2023 रोजी पुरकायस्थ आणि त्यांच्या वकिलांना रिमांड आदेश जारी होण्यापूर्वी देण्यात आली नव्हती असे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पुरकायस्थ यांची अटक आणि कोठडी कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर ठरवत त्यांची सुटका करण्याचे निर्देश देत असल्याचे न्यायालाय देत असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी 30 एप्रिल रोजी या प्रकरणी सुनावणी पूर्ण केली होती. पुरकायस्थ गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरपासून यूएपीए अंतर्गत कोठडीत आहेत.
मोठी बातमी : महादेव बेटिंग अॅपचे धागेदोरे पुण्यातील नारायणगावपर्यंत; 70 ते 80 जण ताब्यात
नेमकं प्रकरण काय होते?
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक या न्यूज वेबसाइटशी संबंधित अनेक पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले होते. ऑगस्ट 2023 मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानंतर हा छापा टाकण्यात आला होता. यात वेबसाइटचे संस्थापक आणि संपादक प्रबीर पुरकायस्थ, पत्रकार अभिसार शर्मा, अनिंद्यो चक्रवर्ती, भाषा सिंह, व्यंगचित्रकार संजय राजौरा, इतिहासकार सोहेल हाश्मी यांचा समावेश होता.
न्यूजक्लिक वेबसाइटवर चिनी फंडिंगसह भारतविरोधी कारवाया केल्याच्या तसेच अमेरिकन करोडपतीकडून निधी घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी वेबसाइटवर गुन्हा दाखल केला. मात्र, न्यूजक्लिकने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. छापेमारीत पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप, संगणकासह इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या होत्या.
न्यूजक्लिक फंडिंग प्रकरणात वेबसाइटच्या संस्थापकला अटक, 46 जणांची चौकशी
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दहशतवाद विरोधी कायदा ‘यूएपीए’ अंतर्गत गुन्हा दाखल करत न्यूजक्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक केली होती.तत्पूर्वी, 2021 मध्ये न्यूज वेबसाइट आणि तिच्या निधी स्रोताची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वेबसाइटवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर ईडीनेही याप्रकरणी गुन्हा दाखल केला.