मोठी बातमी : भीमा कोरेगाव प्रकरणात गौतम नवलखा यांना ‘सर्वोच्च’ दिलासा; पण भरावे लागणार 20 लाख
नवी दिल्ली : भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.14) जामीन मंजूर केला आहे. यावेळी न्यायालयाने गौतम नवलखा यांच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती वाढवण्यास न्यायालयाने नकार दिला. तसेच नजरकैदेत असताना मिळालेल्या सुरक्षेच्या खर्चासाठी 20 लाख रुपये द्यावे लागतील असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयान दिले आहेत. गौतम नवलखा हे मानवाधिकार कार्यकर्ते आणि पीपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राइट्सचे माजी सचिव आहेत. त्यांना भीमा कोरेगाव प्रकरणात ऑगस्ट 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. (Supreme Court grants bail to activist Gautam Navlakha in Elgaar Parishad case)
In a major development, the Supreme Court (today May 14) has granted bail to Bhima Koregaon-accused Gautam Navlakha. The same is subject to the payment of Rs 20 Lakhs for his house arrest.
Read more: https://t.co/H1eahDgQyO#SupremeCourtOfIndia #GautamNavlakha #BhimaKoregaon… pic.twitter.com/SQ3Ssy9Sr6— Live Law (@LiveLawIndia) May 14, 2024
काय म्हणाले न्यायालय?
नवलखा यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात अद्याप आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे खटल्याला बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे नवलखा यांच्या जामिनावरील स्थगिती आणखी वाढवण्याची गरज नाही. मात्र, नवलखा यांना नजरकैदेत असताना मिळालेल्या सुरक्षेच्या खर्चासाठी 20 लाख रुपये भरावे लागतील असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयान दिले आहेत. या प्रकरणातील सहा सहआरोपींना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. नवलखा आणि इतरांना 1 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्रातील पुण्याजवळील भीमा कोरेगाव स्मारकावर जातीय दंगली भडकवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, गौतम नवलखा यांना त्यांचे वाढलेले वय आणि आरोग्य स्थिती लक्षात घेऊन नोव्हेंबर 2022 पासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
नेमकं प्रकरण काय?
1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार झाला. ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठे यांच्यात झालेल्या लढाईच्या स्मृतिपित्यर्थ द्विशताब्दी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. मात्र या ठिकाणी अचानक दंगल उसळली. त्या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अनेकांना अटक झाली होती. पत्रकार गौतम नवलखा यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर त्यांच्यावर झालेले आरोप त्यांनी फेटाळून लावले होते. पण 2020 मध्ये त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीसमोर शरणागती पत्करली होती. तेव्हापासून ते न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबई सीबीडी येथे नजरकैदेत होते.
#BREAKING Supreme Court grants bail to Bhima Koregaon case accused Gautam Navalkha, refuses to extend stay on Bombay HC order. https://t.co/lUbEv1bd4y
— Live Law (@LiveLawIndia) May 14, 2024
UAPA अंतर्गत अटकेत
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना UAPA कायद्याअंतर्गत अटक करण्यात होती. नवलखा शहरी नक्षलवाद चळवळीत महत्वाची भूमिका बजावत असल्याचा आरोप आहे. याशिवाय, नवलखा हे 1991 पासून पुरकायस्थशी संबंधित आहेत आणि 2018 पासून PPK Newsclick Studio Private Limited चे शेअरहोल्डर आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणण्यासाठी पुरकायस्थ यांनी पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रसी अँड सेक्युलॅरिझम (PADS) या गटासोबत कट रचल्याचा आरोपही त्यांच्यावर आहेत.