सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन दिला नाही तर मुलाला हजर करणार; फरार मुलाबद्दल गोगावलेंचा मोठा दावा

सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन दिला नाही तर मुलाला हजर करणार असा दावा पण गोगावले यांनी धाराशिव दौऱ्यादरम्यान केला.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 31T151237.702

महाड मारहाणप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाच्या अडचणी वाढल्या आहेत. (Gogavle) कोर्टाने विकास गोगावले याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर शरणागतीशिवाय तुर्तास कोणताही पर्याय समोर नाही. 2 डिसेंबर 2025 रोजी महाड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान सुरु असताना विकास गोगावले आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली होती.

तुंबळ हाणामारी झाली होती. विकास गोगावले यांच्यासह 29 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे. आता याप्रकरणी मंत्री गोगावले यांनी धाराशिवमध्ये मोठा दावा केला आहे. पोलिसांपासून 24 दिवसांपासून फरार असलेल्या मुलासोबत मंत्री भरत गोगावले यांचं बोलणं सुरू आहे, तुळजाभवानीच्या दरबारात भरत गोगावले यांनी ही कबुली दिली आहे.

पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली, मंत्री गोगावलेंच्या मुलाचा जामीन फेटाळताच राऊतांचा भाजप शिंदेवर वार

सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन दिला नाही तर मुलाला हजर करणार असा दावा पण गोगावले यांनी धाराशिव दौऱ्यादरम्यान केला. रायगड येथील नगरपरिषद निवडणूक दरम्यान राड्यापासून भरत गोगावले यांचा मुलगा पोलीस दप्तरी फरार आहे.याप्रकरणी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भरत गोगावले यांनी तो फरार नसून त्याच्याशी बोलणं सुरू असल्याच वक्तव्य केलं. मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा नगरपरिषद राड्यानंतर गेल्या 24 दिवसांपासून पोलीस दप्तरी फरार आहे. मात्र मुलगा फरार नसून आपण त्याच्या संपर्कात असल्याची माहिती तुळजापुरात गोगावले यांनी दिली.

अटकपूर्व जामिनासाठी आम्ही अर्ज केला होता मात्र तो फेटाळला, आता आम्ही सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. तो नाकारला तर आपण पोलिसात त्याला हजर करू असं गोगावले म्हणाले. पोलीस दप्तरी फरार असलेल्या आरोपीबद्दल मंत्री असलेल्या गोगावले यांनी दिल्याने माहितीमुळे मंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान मुलगा जर मंत्री महोदयांच्या संपर्कात आहे, तर मग त्याला पोलीसांसमोर हजर का करत नाही असा सवाल विचारल्या जात आहे. तर मंत्र्यांचा मुलगा कुठे लपला आहे हे इतक्या दिवसात पोलिसांना कसं माहिती नाही? असा सवाल विरोधक विचारत आहेत.

follow us