बंटी पाटील-मुश्रीफ की शिंदे-फडणवीस कोण ठरणार सरस? महाडिकांची चाल अन् गोकुळमध्ये ट्विस्ट

बंटी पाटील-मुश्रीफ की शिंदे-फडणवीस कोण ठरणार सरस? महाडिकांची चाल अन् गोकुळमध्ये ट्विस्ट

Twist in Gokul Kolhapur Satej Patil Hasan Mushrif Shinde Fadanvis entry : राज्यात जरी भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती असली तरी अजित पवारांच्या नेत्याची मात्र कॉंग्रेस नेत्याला साथ कायम आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना हे नेते नेमके कोण? हा सर्व विषय आहे. राजकारणात अत्यंत महत्त्वाचं केंद्र मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील गोकुळ या राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी दूध संघाचा कारण कोल्हापुरात आमदारकीपेक्षा गोकुळच्या संचालक पदाला जास्त महत्त्व आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यावरून आता महायुती की शाहु आघाडी असा वाद निर्माण झाला आहे. काय आहे हा वाद? तसेच यावादात कॉंग्रेसच्या सतेज पाटलांना साथ देणारे अजित पवारांच्या पक्षाचे हसन मुश्रीफ की गोकुळवर सत्ता आणू इच्छिणारे महायुतीचे शिंदे-फडणवीस कोण सरस ठरणार पाहूयात सविस्तर…

गोकुळच्या संचालक पदाचा नेमका वाद काय?

महाविकास आघाडीच्या काळात महाडिकांची तब्बल 25 वर्षांची सत्ता हिसकावून बंटी पाटील म्हणजेच सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या जोडीने गोकुळची सत्ता मिळवली. हा महाडिकांसाठी मोठा धक्का मानला गेला. याच रागातून महाडिकांकडून सतेज पाटलांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातूनच विधानसभेमध्ये अमेय महाडिकांनी ऋतुराज पाटलांचा पराभव केला. आता ही सूडाची भावना गोकुळच्या माध्यमातूनही समोर येत आहे. त्याचं झालं असं की, ज्यावेळी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या शाहू आघाडीची सत्ता गोकुळमध्ये आली. त्यावेळी पहिले दोन वर्ष सतेज पाटील यांचे नारायण पाटील हे तर त्यानंतर दोन वर्ष म्हणजे सध्या विद्यमान असलेले मुश्रीफांचे अरुणकुमार डोंगळे हे अध्यक्ष होते. तर 25 मे रोजी डोंगळे यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर एका वर्षासाठी नवा अध्यक्ष आणि त्यानंतर निवडणुका घेतल्या जातील. मात्र इथेच खरं खरा ट्विस्ट निर्माण झाला तो ऐन कार्यकाळ संपण्याच्या तोंडावर डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने.

आता पाहुयात डोंगळेंचा राजीनामा अन् शिंदे-फडणवीसांची एन्ट्री

आता डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार देण्याचं कारण म्हणजे फक्त पदाची लालसा नाही. तर ही महाडीकांची चाल आणि फडणवीसांना गोकुळवर युतीची सत्ता असवी ही इच्छा देखील आहे. त्यातूनच हे सर्व प्रकरण घेऊन महाडीक फडणवीसांकडे गेले. फडणवीसांनी अजित पवार आणि मुश्रिफांना बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी जिल्हा बॅंकेचे कारण देत सहकार्य करायला अनुकूलता दाखवली नाही. त्यात उपमुख्यमंत्री असलेल्या शिंदेंनी देखील इंटरेस्ट घेतला. कारण सध्याचे अध्यक्ष असलेले डोंगळे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीसांनी डोंगळेंना राजीनामा न देण्याचं सांगून सतेज पाटील-हसन मुश्रीफ जोडीला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे-फडणवीसांनी गोकुळच्या सत्तेमध्ये इंटरेस्ट घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे येण्याऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये विजय मिळवण्यासाठी महायुतीकडे स्थानिक संस्थांमध्ये सत्तेची कमान हाती असणे गरजेचे आहे.

शरद पवारांचा तातडीने अजित पवारांना फोन; नक्की काय घडलं? वाचा, का केला होता फोन?

दुसरीकडे हसन मुश्रीफ हे जरी महायुतीत शिंदे-फडणवीसांसोबत राज्यात सत्तेत असली तरी जिल्ह्यात आणि गोकुळमध्ये मात्र ते सतेज पाटलांसोबतच असण्यावर ठाम आहेत. शिंदे-फडणवीसांनी अजितदादांना मध्यस्थी करायाला लावली. तरी मुश्रीफ बधले नाहीत. त्यामुळे गोकुळमधील सत्ता कायम ठेवण्यासाठी ते सतेज पाटलांसोबत शिंदे-फडणवीसांना पुर्ण विरोध करणार एवढं नक्की. मात्र यामध्ये काही संचालक हे महायुतीच्या बाजूने असल्याने पाटील अन् मुश्रीफांसमोर देखील मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

विजयोत्सव साजरा पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सवाल

तर गोकुळमध्ये सध्याच्या घडीला केवळ पाटील अन् मुश्रीफांसमोरच सत्ता टीकवण्याचं आव्हान नाहीये. तर शिंदे-फडणवीसांना देखील येथे आपले मनसुबे यशस्वी करणं कठीण आहे. याचं कारण म्हणजे डोंगळेंच्या कारभाराला 19 संचालक वैतागलेले आहेत. त्यातून त्यांचा राजीनामा मागितला जाणार होता. तसेच त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा देखील विचार आहे. मात्र त्या बैठकीकडे डोंगळेंनी पाठ फिरवली. पण संचालकांनी तरी देखील बैठक घेतली आणि गोकुळमध्ये महाविकास आघाडी किंवा महायुतीची सत्ता नसून शाहू आघाडीची सत्ता असल्याचं दाखवून दिलं आहे. ज्यामध्ये सतेज पाटील गट आणि मुश्रीफ गट यांचा समावेश होतो. त्यामुळे एकही संचालक सोबत नसल्याने डोंगळेंचं बंड फार काळ टाकणार नाही. असं दिसतय त्यातून शिंदे-फडणवीसांचा हेतू साध्य होणार नाही. हे देखील स्पष्ट होत आहे. मात्र दुसरीकडे नेहमीच शेवटच्या क्षणी जादूची कांडी फिरवण्याची फडणवीसांची खेळी येथे कितपत कामी येते. संचालकांनी डोंगळेंना अनपेक्षित पाठिंबा दिला तर सतेज पाटील अन् मुश्रीफ याला कसे सामोरे जातात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube