विजयोत्सव साजरा पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सवाल

विजयोत्सव साजरा पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सवाल

Prakash Ambedkar Questioned to PM Modi for Celebration of Opration Sindoor after Pahlagan Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) सुरू केले. या कारवाईअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने संयुक्त कारवाईअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त ( India Pakistan Tension) काश्मीर (पीओके) मध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले (Pahalgam Attack Revenge) केले. त्यानंतर देशभर याला विजयोत्सव म्हणून ठीक ठिकाणी रॅली काढून साजरा करण्यात आला. मात्र यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. त्यात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विजयोत्सव साजरा पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? असं म्हणत पंतप्रधान मोदी यांना सवाल केला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

आज सोमवारी 19 मे रोजी प्रकाश आंबेडकर यांनी एक एक्स या साईटवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी भाजपकडून पहलगाम हल्ल्याला दिलेल्या प्रत्युत्तराचा विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विजयोत्सव साजरा पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? असं म्हणत पंतप्रधान मोदी यांना सवाल केला आहे.

शिष्टमंडळात कोणीही स्थानिक राजकारण आणू नये, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला

या पोस्टमध्ये आंबेडकर म्हणाले की, मोदीजी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? जवळजवळ एक महिना उलटून गेला आहे! तुम्ही कशाचा आनंद साजरा करत आहात? हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या पत्नींना अद्याप न्याय मिळालेला नाही!तसेच त्यांनी या पोस्टमध्ये श्रीनगरचे नेते मीर एहसान यांची पोस्टचा दाखल देखील दिला आहे.

भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडीओ शेअर…

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडीओ जारी केला आहे. भारतीय सैन्याच्या वेस्टर्न कमांडच्या एक्स या सोशल मिडीया साईटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये सैन्यातील जवान म्हणत आहेत की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याने ही सुरूवात झाली. भारतीय आणि भारतीय सैन्याच्या मनात याच्याबद्दल राग नाही लाव्हा होता. डोक्यात एकच विचार सुरू होता. यावेळी असा धडा शिकवू की, त्यांच्या पिढ्यान् पिढ्या लक्षात ठेवतील. ही बदल्याची भावना नाही हा न्याय होता. तसेच या व्हिडीओमध्ये सैन्याने पाकिस्तानवर डागलेल्या क्षपनास्त्रांची देखील फुटेज समोर आले आहेत. 9 मे ला शत्रुने युद्धविरामाच्या नियामांचं उल्लंघन केलं. त्या सर्व कारवायांना भारतीय सैन्याने कडवं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक कारवाई नाही. तर पाकिस्तानसाठी धडा होता. जो त्यांना दशकांपासून मिळणे गरजेचे होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube