शिष्टमंडळात कोणीही स्थानिक राजकारण आणू नये, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला

शिष्टमंडळात कोणीही स्थानिक राजकारण आणू नये, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला

Sharad Pawar On Sanjay Raut : भारत-पाकिस्तान युद्धानंतर आता केंद्र सरकारच्या खासदारांचं शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेटणार आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईचं स्पष्टीकरण भारताला द्यावं लागणार आहे. या शिष्टमंडळावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार (Sharad pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. शिष्टमंडळात कोणीही राजकारण आणू नये, असा टोला शरद पवारांनी लगावलायं.

पाकिस्तानकडून भारताच्या ‘या’ निर्णयाची कॉपी; वाचा, कोण अन् कशासाठी जाणार परदेशात ?

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, हा पक्षावर निर्णय नसतो. जेव्हा नरसिंह राव यांचे सरकार होते, त्यावेळी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ नेमले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली ते शिष्टमंडळ नेमण्यात आले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली मी देखील सदस्य होतो. आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळेस येतात, त्यावेळी पक्षीय भूमिका घ्यायची नसते, असं पवार म्हणाले आहेत.

तसेच आज सरकारने शिष्टमंडळ केले, देश वाटून दिले. भारताची भूमिका काय आहे? ती सांगण्यासाठी हे शिष्टमंडळ आहे. त्यांचे मत काय हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या पक्षाचे एक सदस्य आहेत, असं दिसतंय. मात्र कोणीही इथे स्थानिक राजकारण आणू नये, असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय.

माझ्या संपादकीयाची चर्चा होते तर पुस्तकाची का नाही होणार? ‘नरकातला स्वर्ग’चं प्रकाशन, राऊतांची फटकेबाजी

काय म्हणाले होते संजय राऊत?
शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेत नऊ खासदार आहेत. शरद पवार गट व एकनाथ शिंदे गटाच्या तुलनेत आमचा एक सदस्य जास्त आहे. लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? खरं म्हणजे एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळाली पाहिजे होती. यावरून स्पष्ट होते की सरकार इथेही राजकारण करत आहे.

सरकारी खर्चाने हे वऱ्हाड पाठवायची तशी गरज नव्हती, हे वऱ्हाड निघाले आहे, युरोपला, आफ्रिकेला, पण ते जाऊन काय करणार आहेत? परदेशात आपले हाय कमिशन आहे, ते काम करत आहेत. मग काय गरज आहे? जगात हे प्रश्न घेऊन जात आहेत याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत. पंतप्रधान 200 देश फिरले तरी एकही देश पाठीशी उभा राहिला नाही. म्हणून त्यांच्यावर ही नौंटकी करण्याची वेळी आली असल्याचं संजय राऊत म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube