पाकिस्तानकडून भारताच्या ‘या’ निर्णयाची कॉपी; वाचा, कोण अन् कशासाठी जाणार परदेशात ?

India Pakistan Tension : भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून (Operation Sindoor) लष्करी कारवाईत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं. आता खास (India Pakistan Conflict) रणनिती तयार करून पाकिस्तानला जगात उघडं पाडण्याचा प्लॅन भारत सरकारने केला आहे. मोदी सरकारच्या या प्लॅनमध्ये फक्त भाजपाचेच खासदार नाहीत तर आणखीही काही विरोधी पक्षांचे खासदार यात आहेत. आता हे खासदार विविध देशांत जाऊन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बुरखा फाडण्याचं काम करणार आहेत. भारताच्या या प्लॅनचा पाकिस्तानने धसका घेतला आहे. भारताची कॉपी करत असाच प्लॅन पाकिस्तानने आखला आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाची जबाबदारी पाकिस्तान सरकारने दिली आहे.
याआधी भारत सरकारने पाकिस्तानच्या काळ्या कृत्याचा आणि दहशतवादाचा बुरखा जगासमोर फाडण्यासाठी मोठा निर्णय घेतला. सर्वपक्षीय खासदारांचे प्रतिनिधीमंडळ गठीत केले. या मंडळातील खासदारांना विविध देशांत पाठवले जाणार आहे. भारत सरकारच्या या निर्णयाने पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. यानंतर आपला खोटा अजेंडा परदेशात राबवण्यासाठीच भारतासारखीच चाल खेळली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोवर जबाबदारी दिली आहे.
PM मोदींचा विचार पक्का! पाकविरुद्धच्या प्लॅनमध्ये थरूर अन् ओवैसी; पण का? जाणून घ्याच..
परदेशात जाऊन पाकिस्तानची बाजू मांडणाऱ्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व बिलावल भुट्टो करणार आहेत. पाकिस्तान सरकारने बिलावल भुट्टोच्या नेतृत्वात एक समिती तयार केली आहे. यात माजी मंत्री खुर्रम खान, हिना रब्बानी खार, माजी परराष्ट्र सचिव जलील अब्बास जिलानी आहेत. समितीतील हे सदस्य विविध देशांत जाऊन पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत. पाकिस्तान नेहमीच दहशतवादी कारवाया करत आला आहे. भारताला त्रास देण्याचे अस्थिर करण्याचे त्याचे उद्योग अजूनही सुरुच आहेत. जगात पाकिस्तानची सतत नाचक्की होत आहे. आता समितील सदस्य काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पाकिस्तान करतोय भारताची कॉपी
पाकिस्तानने याआधीही भारताची कॉपी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची कॉपी पाकिस्तानने केली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पाकिस्तानला कठोर संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूर एअरबेसवर पोहोचले होते. याचीच कॉपी पाकिस्तानचा पंतप्रधान शाहबाज शरीफने केली होती. शाहबाज शरीफने सैन्य ठिकाणांना भेटी देण्याचं काम सुरू केलं. या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते. परंतु, त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटला. सोशल मीडियावर लोकांनी या प्रकाराला कॉपी पेस्ट म्हणत शाहबाज शरीफला चांगलंच ट्रोल केलं.
होय, भारताने घुसून मारलं! पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफांनीच केलं मान्य; व्हिडिओ व्हायरल