ब्रेकिंग : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर टरकलेल्या पाकिस्तानने BSF जवानाला 20 दिवसांनी सुखरूप सोडलं

  • Written By: Published:
ब्रेकिंग : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर टरकलेल्या पाकिस्तानने BSF जवानाला 20 दिवसांनी सुखरूप सोडलं

Pak returns BSF jawan After 20 Days : ऑपरेशन सिंदूरनंतर टरकलेल्या पाकिस्ताने भारताच्या BSF जवानाला 20 दिवसांनी सुखरूप सोडलं असून, शाॉ हे चुकून पाकिस्तानच्या (Pakistan Border) हद्दीत गेले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतले होते. पीके शॉ यांच्या परतीबाबत सीमा सुरक्षा दलाने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात बीएसएफने सांगितले आहे की, आज (दि.14) बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ हे अटारी-वाघा सीमेवरून भारतात सुखरूप परतले आहेत. शॉ २३ एप्रिल २०२५ पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होते. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता जॉइंट चेक पोस्ट अटारीमार्गे शॉ यांना भारताच्या ताब्यात देण्यात आले असून, हे सर्व कारवाई शांततेत आणि स्थापित प्रोटोकॉलनुसार पार पडल्याचे BSF ने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने घेतला पहलगामचा बदला 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून बदला घेत पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढला होता. या हल्ल्यांमध्ये जवळपास 100 अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यात दहशतवाद्यांचाही सहभाग आहे.

भारतानेही पाकिस्तीनी रेंजरला सोडलं 

बीएसएफने राजस्थानमधील भारतीय सीमेजवळ एका पाकिस्तानी रेंजरला पकडले होते. त्यालादेखील आज पाकिस्तानकडे सुखरूप सोपवण्यात आले आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने एका पाकिस्तानी रेंजरला अटक केली होती. पाकिस्तानी रेंजर सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी या रेंजरला पकडले होते.

चांगल्या अन् वाईट काळात…पाकिस्तान, तुर्की दोस्ती जिंदाबाद! तुर्कीचा पुन्हा उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा

जवानाने चुकून सीमा ओलांडली होती

बीएसएफ जवान पूर्णब कुमार शॉ २३ एप्रिलपासून पाकिस्तानच्या ताब्यात होते. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील भारत-पंजाब सीमेवर नुकतेच ड्युटीवर रुजू झालेले शॉ २३ एप्रिल रोजी झिरो लाईनजवळ शेतात काम करणाऱ्या सीमावर्ती ग्रामस्थांना (शेतकऱ्यांना) मदत करत असताना चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेले. त्यावेळी पाकिस्तान सीमा सुरक्षा दलाने त्यांना पकडले होते. त्यानंतर जवळपास 20 दिवस शॉ हे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. मात्र, आज त्यांची अटारी सीमेवरून भारतात सुखरूप घरवापसी करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube