मोदी-जेडी व्हान्स यांच्यात फोनवरून भारत-अमेरिका संबंधांवर महत्त्वपूर्ण चर्चा

नरेंद्र मोदी आणि जेडी वान्स यांच्यात फोनवरून चर्चा; भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर महत्त्वाची बातचीत.

PM Modi JD Vance Phone Call

PM Modi JD Vance Phone Call; Discuss Strengthening India-US Strategic Partnership: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स(JD Vance) यांच्यात शनिवारी फोनवरून महत्त्वपूर्ण चर्चा झाली. जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन केला. यावेळी भारत-अमेरिकेची व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उपायांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

Gen Z ची दिशाभूल करण्यात आली; राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले धर्मेंद्र प्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या फोनवरील चर्चेची माहिती दिली. चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जेडी व्हान्स आणि त्यांच्या पत्नी उषा व्हान्स (Usha Vance) यांना त्यांच्या मुलाच्या जन्माबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठीही शुभेच्छा व्यक्त केल्या.

FCRA कायद्यावरून अमेरिकेत चिंता

दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा अशा वेळी झाली आहे, जेव्हा अमेरिकेचे खासदार रिले मूर यांनी भारताच्या परकीय देणगी नियमन कायद्यात (FCRA) प्रस्तावित बदलांबाबत चिंता व्यक्त केली होती. या बदलांचा परिणाम चर्च आणि धार्मिक संस्थांना मिळणाऱ्या परदेशी निधीवर होऊ शकतो, असा दावा मूर यांनी केला होता. त्यांनी या प्रस्तावाला ख्रिश्चनविरोधी पाऊल असल्याचे म्हटले होते.

Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपसोबत जाणार? सुप्रिया सुळे 8 खासदारांसह PM मोदींना भेटणार

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भारताच्या कायद्यांमध्ये बदल करणे हा देशाचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच अमेरिका यांसह अनेक देशांमध्ये परदेशी निधीबाबत स्वतंत्र कायदे आणि नियम असल्याचेही मंत्रालयाने नमूद केले होते.

मे 2025 मध्येही मोदी-व्हान्स यांच्यात झाली होती चर्चा

पंतप्रधान मोदी आणि जेडी व्हान्स यांच्यात यापूर्वीही मे 2025 रोजी फोनवर चर्चा झाली होती. त्यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान तणाव वाढला होता. पंतप्रधान मोदी यांनी नंतर लोकसभेत या फोन कॉलचा उल्लेख केला होता. व्हान्स यांचे अनेक मिस्ड कॉल पाहिल्यानंतर आपण त्यांना परत फोन केल्याचे मोदी यांनी सांगितले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, व्हान्स यांनी पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती दिली होती. यावर भारताची प्रतिक्रिया आणखी कडक असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले होते.

भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांवर यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

दरम्यान, मोदी आणि व्हान्स यांच्यात झालेल्या फोन चर्चेत भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर झालेली चर्चा दोन्ही देशांमधील सातत्यपूर्ण उच्चस्तरीय संपर्काचे संकेत देत आहे.

follow us