विद्यार्थ्यांना दिलासा; ताण येणार नाही असे वेळापत्रक तयार करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश

School Education Department : विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण होऊ नये यासाठी आता शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेत काही मार्गदर्शक सूचना

School Education Department

School Education Department : विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण होऊ नये यासाठी आता शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेत काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. यानुसार आता तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन करावी लागणार आहे. याच बरोबर खासगी शिकवणी वर्गांवरही काही बंधने घालणयात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. एका प्रकरणात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शालेय शिक्षण विभगाणे मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय निरीक्षण समितीत उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे सदस्य असणार आहे. तसेच या समितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने नियुक्त सामाजिक कार्यकर्ता, बालमानसतज्ज्ञ नामनिर्देशित सदस्य असणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार (School Education Department) , शंभर किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थिसंख्या असणाऱ्या संस्थेत किमान एक पात्र समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ यांची नियुक्ती करावी, शंभरपेक्षा कमी विद्यार्थिसंख्या असणाऱ्या ठिकाणी बाह्य मानसिक आरोग्य व्यावसायिकांची मदत घ्यावी लागणार आहे. तसेच खासगी शिकवणी वर्गांना एका महिन्याच्या आत तक्रार निवारण यंत्रणा तयार करावी लागणार आहे. तसेच त्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर आणि व्यवसायाच्या ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

तसेच सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरक अध्यापक, कर्मचाऱ्यांना प्रमाणिक मानसिक आरोग्यतज्ज्ञाकडून वर्षातून दोन वेळा प्रशिक्षक अनिवार्य राहणार आहे. याचबरोबर सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मानसिक आरोग्य सेवा, रुग्णालये, आत्मगत्या प्रतिबंधात्मक हेल्पलाइनकडे तत्काळ संदर्भ देण्याची लेखी कार्यपद्धती तयार करुन त्याची अंमलबजावणी करावी. टेलिमानस, आत्महत्या प्रतिबंधात्मक हेल्पलाइन क्रमांक वसतिगृह, वर्गखोल्या, सामायिक वापराची ठिकाणे, शिकवण वर्गाच्या संकेतस्थळावर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधंनकारक आहे.

शालेय शिक्षण विभागाणे शिकवणी वर्गांसाठी देखील काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत

– वेळापत्रक विद्यार्थ्यांवर ताण येणार नाही, असे असावे.

– विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षकांना आठवड्यात किमान एक सुटी द्यावी.

– सुटीच्या दुसऱ्या दिवशी कोणतीही मूल्यमापन चाचणी, परीक्षा घेऊ नये.

– शिकवणी वर्ग एका दिवसात पाच तासांपेक्षा अधिक नसावेत.

– तासिका सकाळी फार लवकर किंवा सायंकाळी फार उशिरा ठेवू नयेत.

– शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश असलेल्या संस्था, शिकवणी वर्गांना समुपदेशक, मानसशास्त्रज्ञाची नियुक्ती, तक्रार निवारण यंत्रणेची स्थापना करावी.

– विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, क्षमतावृद्धीसाठी उपक्रम राबवावेत.

– प्रत्येक खासगी शिकवणी वर्गाने प्रभावी समुपदेशन व्यवस्था निर्माण करावी.

– मूल्यमापन चाचण्यांचे निकाल सार्वजनिक पद्धतीने जाहीर करू नयेत.

– पालकांसाठी सकारात्मक पालकत्वाचे महत्त्व अधोरेखित करावे.

वाकड गावठाणातून विजयाचा संकल्प : श्रुती वाकडकर यांच्या नेतृत्वाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

– वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कायदा अशा संस्थांमध्ये प्रवेशासाठी किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यशासाठी कोणतीही हमी देत नाही, याबाबत विद्यार्थी आणि पालकांना खासगी शिकवणी चालकांनी स्पष्टपणे सांगण्याची सूचना

follow us