शाळेतील मध्यान्ह भोजनातील विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी काय आहेत शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना?

शाळेतील मध्यान्ह भोजनातील विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी काय आहेत शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना?

Jalna : शाळेतील मध्यान्ह भोजनातील विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी (Jalna) शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना,विद्यार्थ्यांना भोजन देण्याच्या अर्धा तास अगोदर मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंपाकी घेणार भोजनाची टेस्ट, टेस्ट घेतल्यानंतर अर्ध्या तासाने दिलं जाणार विद्यार्थ्यांना भोजन, जालना जिल्ह्यातील शाळांमध्ये अंमलबजावणी सुरु

1ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिलं जातं. या मध्यान्ह भोजनातून अनेकवेळा विद्यार्थ्यांमध्ये विषबाधेचे प्रकार घडलेले आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी आणि भोजनाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने आता कडक मार्गदर्शक सूचना जालना जिल्ह्यात लागू केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार असून, त्यांचं आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

ठाकरे बंधूंचा बेस्ट निर्णय, ठाकरे गट अन् मनसे एकत्र निवडणूक लढणार, विरोधकांचं टेन्शन वाढलं

या नव्या सूचनांनुसार, विद्यार्थ्यांना जेवण देण्याच्या अर्धा तास आधी संबंधित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक किंवा स्वयंपाकी स्वतः भोजनाची टेस्ट घेऊन अन्नाचा दर्जा तपासणार आहे.भोजनाची चव तपासल्यानंतर विशेष नोंदवहीत तपशीलवार नोंद करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे भोजनात होणारी उदासीनता, दर्जाचा अभाव आणि अन्नातून होणारे आजार टाळले जातील, असा शिक्षण विभागाचा विश्वास आहे.

दरम्यान, जालना जिल्हयातील सर्व शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या या सूचनांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. जालन्यातील पिरपिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत या सुचनेची कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube