Jalna News : मोबाईल पाण्यात टाकला, सातवीच्या मुलाने महिलेला संपवलं…

Jalna News : जालन्यातील आंतरवली टेंभी गावात एकाक 13 वर्षीय बालकाने 41 वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून संपवल्याची (Jalna Murder Case) घटना घडलीयं. मृत महिलेने बालकाचा मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याचा राग मनात धरुन सातवीला शिकणाऱ्या बालकाने महिलेला संपवल्याची कबुली बालकाने पोलिसांना दिलीयं.
सीसीटीव्ही पुरावे समोर आणा, कारागृहातील मारहाण प्रकरणानंतर महादेव गीतेच्या पत्नीचे गंभीर आरोप
ही घटना 25 मार्च रोजी घडली होती. 25 मार्चला मिराबाई उर्फ संध्या बांडारे या महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी तीर्थपुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांची तपासाची चक्रे फिरवली असता बालकाने महिलेला संपवल्याचं समोर आलंय.
या घटनेतील मयत महिलेने विधीसंघर्ष बालकाचा मोबाईल पाण्यात टाकून खराब केला होता. याचाच राग बालकाच्या मनात होता. 25 मार्च रोजी या बालकाने महिला शेतात झोपलेली असताना तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं समोर आलंय.
न्यूझीलंडला धक्का! दुसऱ्या वनडेआधी नववा खेळाडूही आऊट; पाकिस्तानला विजयाची संधी
पोलिसांनी या प्रकरणी विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतलंअसून पुढील कारवाई करण्यासाठी त्याला बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आल्याची माहिती जालन्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिलीयं.
या प्रकरणातील विधीसंघर्ष बालक 13 वर्ष 6 महिने वय असून या प्रकरणी तपासाअंती बालकाने पोलिसांना कबुली दिलीयं.मृत महिला शेतात जाणारे पाणी वारंवार अडवत होती, तसेच बालकाचा मोबाईल मृत महिलेने पाण्यात टाकून खराब केला होता. त्यामुळेच बालकाने डोक्यात दगड घालून संपवलं आहे. या घटनेमुळे जालना जिल्हा हादरुन गेला असून एकच खळबळ उडालीयं.