संकटाची भीती अन् महिलेने दागिने केले भोंदूबाबाच्या स्वाधीन; त्याने हातावर लिंबू देताच…

woman gave her jewelry to fraudster in Pune : पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही भाबडा समाज अंधश्रध्येला बळी पडून आपलं नुकसान करून घेतानाच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. अशाच एका घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. एक महिला अशाच एका भोंदूच्या भोंदूगिरीला बळी पडली आणि लाखोंचं नुकसान करून घेतलं आहे.
काय आहे नेमकी घटना?
ही घटना घडली आहे पुण्यातील हडपसर भागातील. घरावर संकट येणार असून, ते दूर करण्याच्या बतावणीने साडेतीन लाखांचे दागिने चोरून पसार झालेल्या भोंदूला हडपसर पोलिसांनी अटक केली. नीळकंठ सूर्यवंशी (वय 35, रा. कण्हेरसर, असे अटक करण्यात आलेल्या भोंदूचे नाव आहे. याबाबत एका 44 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
हिंदी चित्रपटातील डॉयलॉगवरून टीका करणाऱ्या दमानिया, देसाईंना सुरेश धसांचा इशारा
फिर्यादी महिलेचा पती हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. दररोजच्या त्रासाने वैतागलेल्या महिलेला दारू सोडण्यासाठी एका भोंदूच्या संदर्भात माहिती मिळाली आणि ती नवऱ्याला घेऊन खेड तालुक्यातील कण्हेरसर मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेली होती. तिथे आरोपी सूर्यवंशी त्यांना भेटला. त्या वेळी सूर्यवंशीने फिर्यादी महिलेच्या पतीला दारू सोडण्यास सांगितले. सूर्यवंशीच्या सांगण्यावरून पतीने दारू सोडल्याने महिलेचा विश्वास बसला. पतीने दारू सोडल्यावर फिर्यादीचा आरोपीवर विश्वास बसला. त्यानंतर फिर्यादी आणि आरोपी सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. आपल्या घरातील, कौटुंबिक अडचणी फिर्यादी ही आरोपीला सांगत असे.
Video : ‘दुप्पट किंमत द्या…’ अनंत अंबानी यांनी खरेदी केल्या 250 कोंबड्या, कारण जाणून घ्या…
त्यानंतर अचानक 25 मार्च रोजी आरोपीने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्या फोन कॉल मध्ये आरोपी फिर्यादीला म्हणाला तुमच्या घरावर मोठं संकट आलं आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला येतो. नंतर आरोपी सूर्यवंशी याने 27 मार्च रोजी महिलेला हडपसर गाडीतळ परिसरात बोलावले आणि भेटायला येताना मंगळसूत्र, मुलीची सोनसाखळी घेऊन यायला सांगितलं. तुम्ही दागिने घेऊन या मी तुम्हाला दागिने मंतरून देतो, असे सांगितले.
वक्फ बोर्ड तुमच्या पप्पाची जहागीर नाही, इम्तियाज जलील यांचं सडेतोड भाष्य
भोंदू वर विश्वास बसलेली महिला दुपारी दीडच्या सुमारास आरोपी सूर्यवंशीला भेटला आली. दोघांनी एका रसवंतिगृहात रस घेतला, त्यानंतर त्याने महिलेला एक लिंबू दिले. महिलेकडील दागिने मंतरून देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र, सुवर्णहार, सोनसाखळी असा ऐवज प्लास्टिक पिशवीत ठेवण्यास सांगितले. दागिन्यांची पिशवी त्याने स्वत:कडे ठेवली. महिलेला लिंबू घेऊन पुढे चालण्यास सांगितले. मी सांगितल्यानंतर लिंबू फेकून द्या, असे त्याने सांगितले.
महिलेचा त्या भोंदूवर इतका विश्वास होता की भोंदू सांगन त्या दिशेने महिला चालत राहिली. महिला पुढे चालत असतानाच भोंदूने मागच्या मागे पोबारा केला. भोंदूचा मागून आवाज येत नाही आणि तो काही सांगत नाही हे पाहून काही वेळानंतर महिलेने मागे वळून पाहिले. मागे वळून पाहताच तिला धक्का बसला कारण मागे ना भोंदू सूर्यवंशी होता ना दागिन्याची पिशवी. एव्हाना सूर्यवंशी दागिन्याची पिशवी घेऊन पसार झाला होता. महिलेला आता कळालं होतं की आपली फसवणूक झाली.
त्यानंतर महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी आणि पथकाने पसार झालेल्या सूर्यवंशीला पकडले. त्याच्याकडून चोरलेले दागिने जप्त करण्यात आले. सूर्यवंशीने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सूर्यवंशीला न्यायालयात हजर करण्यात आले.