वक्फ बोर्ड तुमच्या पप्पाची जहागीर नाही, इम्तियाज जलील यांचं सडेतोड भाष्य

वक्फ बोर्ड तुमच्या पप्पाची जहागीर नाही, इम्तियाज जलील यांचं सडेतोड भाष्य

imtiaz jalil : केंद्र सरकारकडून वक्फ बोर्डासंदर्भात बिल मांडण्यात येत आहे. या बिलाला चंद्रबाबू नायडू, नितेश कुमार, अजित पवारांसह सर्वांनीच उघड सपोर्ट केला आहे. पण ही मुस्लिम समाजाने दान केलेली मालमत्ता असून तुमच्या पप्पाची जहागीर नाही, असं रोखठोक भाष्य एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (imtiaz jalil) यांनी केलंय. बीडमधील मस्जिद स्फोट प्रकरणावर बोलत असताना त्यांनी वक्फ बोर्ड बिलावर आपली भूमिका स्पष्ट केलीयं.

पुढे बोलताना जलील म्हणाले, वक्फ बोर्डाला आम्ही विरोध केलेला आहे. वक्फ बोर्डाची संपत्ती ही मुस्लिम समाजाची संपत्ती आहे. जर वक्फ बोर्डावर तुमचे लोकं येत असतील तर इतर जातीधर्माच्या बोर्डावरही आमचे लोकं टाका, अशी मागणीही यावेळी जलील यांनी केलीयं.

प्रेम, संघर्ष आणि धक्कादायक खुलासे: ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ मालिकेत येणार ट्विस्ट; अंकितने केले सुतोवाच

तसेच बीडमधील मस्जिदमध्ये आरोपींनी सिगारेट पीत, रिल्स करीत स्फोट घडवला. त्यांना आता पोलिसांची आणि सरकारची भीती राहिलेली नाही. युपीमधलं गुंडाराज आता महाराष्ट्रात दिसता कामा नये, महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे. महाराष्ट्राला शांती हवी आहे, या लोकांवर कारवाई केली पाहिजे, अशीही मागणी यावेळी जलील यांनी केलीयं.

इतिहास काहीही असो पण औरंजेबाने देशावर राज्य केलंय…
इतिहास कसाही असुद्या पण या देशावर औरंगजेबने राज्य केलेले आहे. औरंगजेब जेव्हा मरणार होता तेव्हा त्याने साधी कबर असावी आणि त्या काळात तो राजा असतानाही आणि त्यांनी सांगितले होते की माझी कबर खुप मोठी, चांगली आणि सोन्याची करा असे म्हटले नाही, त्यामुळे त्यांच्या इच्छेप्रमाणे ती साधी कबर आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जो मुद्दा सांगितला आहे, ती कबर काढू नये, तिथेच ठेवावी आणि इतिहास काय होता ते लोकांना कळू द्यावा ते योग्य आहे.ज्यांना पाहायची आहे ते लोक पाहातील आणि जे लोक धर्माच्या नावाखाली कबर उखडून टाकण्याची भाषा बोलतात, हे सर्व लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन घाणेरडे राजकारण करीत असतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube