हिंदी चित्रपटातील डॉयलॉगवरून टीका करणाऱ्या दमानिया, देसाईंना सुरेश धसांचा इशारा

हिंदी चित्रपटातील डॉयलॉगवरून टीका करणाऱ्या दमानिया, देसाईंना सुरेश धसांचा इशारा

Suresh Dhas Aligations on Anjali Damaia and Trupti Desai : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा धनंजय मुंडे माजी कृषिमंत्री राहिलेल्या कृषी खात्यातील गैरवहार असो भाजप आमदार सुरेश धस यांनी नेहमीच आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र दुसरीकडे ते भाजपचे म्हणजेच सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्याच सत्तेमध्ये धनंजय मुंडे यांचा पक्ष देखील विराजमान आहे. तरी देखील सुरेश धस यांनी केलेले आरोप हे केवळ हिरो बनण्यासाठी आहे. त्याचबरोबर ते फार चित्रपट पाहत असल्याने चित्रपटातील डायलॉग मारतात. असा टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी लगावला होता. त्यावर आता पत्रकार परिषदेमध्ये धस यांनी या दोघींनाही उत्तर दिला आहे.

Video : ‘दुप्पट किंमत द्या…’ अनंत अंबानी यांनी खरेदी केल्या 250 कोंबड्या, कारण जाणून घ्या…

यावेळी बोलताना धस म्हणाले की, अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांना बीड जिल्ह्यामधील खाचखळगे माहित नाही. त्यामुळे त्या काहीही बोलतात. खोक्याच्या प्रकरणामुळे मी अडचणी देण्याचा काहीही संबंध नाही. त्यानी जे काही केलं. त्याची शिक्षा तो भोगत आहे. असं म्हणत सुरेश धस यांनी तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया यांना चित्रपटातील डायलॉगच्या टिकेवरून सुनावले आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई?

अंजली दमानिया म्हणाल्या की, मला असं वाटतं की, सुरेश धसता फार जास्त प्रमाणात हिंदी पिक्चर बघतात. कारण त्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये खूपसे डायलॉग देखील आपल्याला येताना दिसतात. दोन महिने संतोष देशमुख यांना न्याय खरंच मिळून देण्यासाठी लढताहेत. अशी ही जी त्यांची इमेज झाली होती. त्याला जेव्हा बावनकुळे म्हणाले की देशमुख प्रकरणात मुंडेंशी सामंजस्य करा. तेव्हा तो पहिला तडा गेला. म्हणून ते सावरण्यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी हा केलेला एक वायफळ प्रयत्न आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं-तिसरं काहीही नाही. असं माझं स्पष्ट मत आहे.

वक्फ बोर्ड तुमच्या पप्पाची जहागीर नाही, इम्तियाज जलील यांचं सडेतोड भाष्य

तर तृप्ती देसाई म्हणाल्या की, खोक्या भोसले आणि सुरेश धस यांची संबंध जगजाहीर आहेत. त्यामुळे सुरेश धस घाबरले आहेत. त्यामुळे ते त्यांची आवड असलेल्या चित्रपटांचे सीन बनवण्याचे काम करत आहेत. काहीतरी डायलॉग मारून ते सीन क्रिएट करतात. त्यामुळे सुरेश धस यांना विलन करण्याचा प्रयत्न कोणी करत नसलं तरी देखील बीडच्या राजकारणात त्यांना हिरो व्हायचं म्हणून अशा पद्धतीने त्यांनी या प्रकरणाचा बाऊ करण्याचा प्रयत्न केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube