मोठी बातमी ! मुलीचे प्रेमप्रकरण कळलं; वडिलांनी मुलीची हत्या करत रचला बनाव

Jalna News: जालना जिल्ह्यात एक मोठी घटना घडलीय. मुलीचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे वडिलांना समजले. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी मुलीला गळफास देत तिला ठार केले. मुलीची हत्या केल्यानंतर वडिलांनी एक बनाव केला. मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. तशी माहिती पोलिसांना दिली. परंतु पोलिस चौकशीत संशय निर्माण झाला. चौकशीत वडिलांनी प्रेमप्रकरणातून मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुलीचे वडिल हरी बाबूराव जोगदंड याला पोलिसांनी अटक केली.
जालना जिल्ह्यातील बदनापूर (Badnapur Police) पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे 5 सप्टेंबर रात्रगस्तीवर होते. दावलवाडी गावांमधील हरी बाबुराव जोगदंडच्या मुलीने गळफास घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. या मुलीने आत्महत्या केली नसून, काहीतरी घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी चौकशी केली असता वेगळाचा प्रकरण समोर आला.
आम्हाला त्याचा अंदाज कधी आला नाही; आयुष कोमकर हत्येबाबात आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले?
समाजात अपमान झाल्याने संताप
मुलीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण (Daughter love) होते. त्याचा अपमान सर्व समाजात झाल्याने वडिलांनी स्वतः च्या मुलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. खून पचवण्यासाठी तिचे गळ्याला दोरी बांधून लोखंडी अँगलला लटकवले होते. मुलीचे प्रेत बदनापूर (Badnapur) ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाऊन शवविच्छेदन करण्यात आले.त्यामध्ये मुलीचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस.
भाजप खासदार निशिकांत दुबे अहंकारी; खासदार राजीव प्रताप रुडी नक्की असं का म्हणाले?
प्रेम प्रकरणातून मुलीचा गळा दाबून खून
पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी प्राथमिक चौकशी केली असता सदर मुलीचे वडील हरी बाबुराव जोगदंड यांनी मुलीच्या प्रेम प्रकरणातून मुलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. लगेच आरोपीस ताब्यात घेउन पोस्ट बदनापूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.