…त्याने मला स्पर्श करताच मी त्याच्या…अभिनेत्रीला राग अनवार झाला अन् नंतर काय घडलं?
अनेक शॉर्ट फिल्म्स आणि वेब सीरिजमध्ये दिसलेल्या अभिनेत्रीने हा धक्कादायक खुलासा केला होता. आता ही अभिनेत्री नेमकं
Film industry : फिल्म इंडस्ट्रीमध्ये पडद्यावर ग्लॅमरस अंदाजात दिसणाऱ्या अभिनेत्रींच्या आयुष्यात काळी बाजू देखील असते. अभिनेत्रींना अनेक वाईट अनुभव देखील असतात. एक मराठमोळी अभिनेत्री देखील आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण, तिने एका अभिनेत्याने तिच्यासोबत असं काही कृत्य केलं की तिने थेट त्याच्या कानशिलात लगावली.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून राधिका आपटे आहे. (Film) तिने भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा स्वॅग आणि अनोख्या स्टाइलसाठी ती ओळखली जाते. चित्रपट, वेब सीरिज आणि शॉर्ट मूव्हीजमध्ये तिने उल्लेखनीय काम केले आहे आणि प्रत्येक भूमिकेत जीव ओतला आहे. ओटीटी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधिकाच्या डॅशिंग लूकपासून ते सामान्य स्त्रीच्या भूमिकेपर्यंत किंवा स्क्रिप्टच्या गरजेनुसार बोल्ड सीन देण्यापर्यंत, प्रत्येक भूमिकेत राधिका स्वतःला उत्तमरित्या सादर करते. तिच्या करिअरमध्ये तिने प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे.
Inspector Zende : वडिलांच्या कथांपासून ते पडद्यावर: ओम राऊतचे इन्स्पेक्टर झेंडेशी खास नाते
अंधाधुनमध्ये आयुष्मान खुरानासोबत, पॅडमॅन मध्ये अक्षय कुमारची पत्नी बनून आणि मांझी मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी बनून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. राधिकाने तिच्या करिअरची सुरुवात 2005 मध्ये शाहिद कपूरच्या वाह! लाइफ हो तो ऐसी या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तिने छोटीशी भूमिका साकारली होती. ही भूमिका छोटी असली तरी याच चित्रपटातून तिने आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. राधिका 2009 मध्ये बंगाली चित्रपट अंतहीन मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती.
करिअरच्या सुरुवातीला राधिकाने एका सहकलाकाराच्या कानशिलात लगावली होती. ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा ती एका तमिळ चित्रपटाच्या शूटिंग करत होती. याचा उल्लेख राधिकाने स्वतः एका मुलाखतीत केला होता. तिने सांगितले होते की, एका दिवशी सेटवर एका अभिनेत्याला तिने कानाखाली मारली होती. ती त्या अभिनेत्याला ओळखतही नव्हती आणि शूटिंगदरम्यान त्या अभिनेत्याने अचानक तिच्या पायाला गुदगुल्या करायला सुरुवात केली होती. “मी त्याला ओळखतही नव्हते आणि त्याने मला स्पर्श करून गुदगुल्या केल्या, मला राग अनावर झाला आणि त्याच्या कानशिलात मारली, असं तिने सांगितलं.
राधिकाने थिएटरपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. तिने वाह लाइफ हो तो ऐसी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती सेक्रेड गेम्स, लस्ट स्टोरीज यांसारख्या वेब सीरिजमध्ये वेगळ्या अंदाजात दिसली आहे. तसेच पॅडमॅन आणि अंधाधुंध यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिने आतापर्यंत आयुष्मान खुराना, अक्षय कुमार आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासह प्रत्येक स्टारसोबत काम केलं आहे.
