आम्हाला त्याचा अंदाज कधी आला नाही; आयुष कोमकर हत्येबाबात आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले?

  • Written By: Published:
News Photo   2025 09 07T211935.356

Ayush Komkar Murder Case : वनराज आंदेकरचा भाचा आयुष कोमकरची नुकतीच हत्या झाली. दरम्यान, ही हत्या होईल असा अंदाज पोलिसांना नव्हता अशी माहिती समोर आली आहे. याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कबुली दिली आहे. यापुढे गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

गणपती विसर्जनाच्या आदल्या रात्री पुण्यातील नाना चौकात 20 वर्षाच्या आयुष गणेश कोमकरची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. आयुष कोमकरच्या हत्येला वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून पाहिलं जात आहे. (Murder) या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात मकोकाअंतर्गत कारवाई करणार असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.

खूनाचा बदला खून! आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरचा रक्तरंजित इतिहास

आयुष कोमकर याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

टोळीयुध्दातून आयुष कोमकर (वय १८, रा. भवानी पेठ) याचा नाना पेठेत शुक्रवारी सायंकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आयुष हा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. या प्रकरणी कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार समर्थ पोलिस ठाण्यात सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६८), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१), तुषार निलंजय वाडेकर (वय २६), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), अमन युसूफ पठाण ऊर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील, अमित प्रकाश पाटोळे (वय १९), सुजल राहुल मेरगू (वय २३, सर्वजण रा. नाना पेठ) या १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघा आरोपींना पोलिस कोठडी

या प्रकरणी अटक केलेल्या यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ‘वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पूर्वनियोजित कट रचला. अमन पठाण आणि यश पाटील याने आयुषवर गोळीबार केला. त्यावेळी अमित पाटोळे व सुजल मेरगू घटनास्थळी हजर होते. गोळीबारानंतर ‘इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच’ असे म्हणत आरोपींनी दहशत माजविली. घटनास्थळी १२ काडतुसे आणि एक अर्धवट काडतूस सापडले असून, मृतदेहात नऊ काडतुसे आढळली आहेत. तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी द्यावी,’ असा युक्तिवाद सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी केला.
अॅड. प्रशांत पवार व अॅड. मिथुन चव्हाण यांनी आरोपींची बाजू मांडली. आंदेकर व कोमकर कुटुंबात दिवाणी स्वरूपाचे वाद असून, वनराज आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. अटक आरोपींचा गुन्ह्याशी संबंध नाही, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्राजक्ता आपटे यांच्या न्यायालयाने आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या