Ayush Komkar Case : पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता आंदेकर कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे.
या प्रकरणात एकूण 13 आरोपी असून 5 आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
18 वर्षीय आयुष कोमकर याचा मृत्यू झाला. हा हल्ला वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या बदल्यासंबंधी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुंड स्वतःच्या भाच्याची हत्या करतील असा अंदाज पोलिसांना नव्हता अशी कबुली पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यानी दिली.