मोठी बातमी, गणेश कोमकर हत्या प्रकरण; आंदेकर कुटूंबाची सगळी बॅंक खाती सील
Ayush Komkar Case : पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता आंदेकर कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे.

Ayush Komkar Case : पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता आंदेकर कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणात पोलिसांनी वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकरला अटक केली आहे. तर आता या प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, पोलिसांनी आंदेकर कुटूंबाची सगळी बॅंक खाती आणि लॅाकर सील केले आहे. याचबरोबर सगळ्या मालमत्तांची माहिती नोंदणी महानिरीक्षकांकडून घेऊन फॅारेन्सिक ॲाडिटर द्वारा तपास करुन जप्तीची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
तसेच आंदेकरांनी सुरू केलेल्या कंपन्यांच्या डायरेक्टरची ही चौकशी सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत छापेमारी करत कारवाई केली आहे. तर दुसरीकडे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सोनाली आंदेकर (Sonali Andekar) हिच्यासोबत कृष्णा आंदेकर याच्या पत्नीला सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता आयुष कोमकर हत्या प्रकरणात संपूर्ण आंदेकर कुटुंब पोलिसांच्या ताब्यात आहे.
आयुष कोमकरची हत्या
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गेल्या वर्षी कौटुंबिक वादातून गणेश कोमकरकडून हत्या करण्यात आली होती. याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने 5 सप्टेंबर रोजी गणेश कोमकरचा मुलगा आयुष ऊर्फ गोविंद कोमकरची (Ayush Komkar Murder Case) गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक जणांना ताब्यात घेतले आहे.
Video : व्होट डिलीट करता येत नाही, राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे जोरदार प्रत्युत्तर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत आंदेकर टोळीचा मुख्य बंडूअण्णा राणोजी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, तसेच अमन युसूफ पठाण उर्फ खान, सुजल मेरगू, अमित पाटोळे, यश पाटील यांना अटके केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता.