पुणे हादरलं! आंदेकर टोळीने वर्षभरानंतर वनराज आंदेकरच्या खुनाचा घेतला बदला; नाना पेठेत मर्डर

  • Written By: Published:
पुणे हादरलं! आंदेकर टोळीने वर्षभरानंतर वनराज आंदेकरच्या खुनाचा घेतला बदला; नाना पेठेत मर्डर

Pune Crime : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या अगोदर नाना पेठेत एका तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. यामध्ये हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. त्यामध्ये तरुणाचा जाग्यावरच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव गोविंदा गणेश कोमकर आहे. (Pune) गणेश हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजीवनी कोमकरचा पुतण्या आहे. गणेश कोमकर हा देखील आरोपी असुन तो तुरुंगात आहे. संजीवनी ही वनराजची सख्खी बहीण आहे. वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळीयुद्ध भडकण्याची भीती होती पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात आंदेकर कुटुंबाचा रंक्तरंजित इतिहास तब्ब्ल पाच दशकांचा आहे. त्यामुळं वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

वनराज आंदेकर हत्येला वर्ष पूर्ण होताच पुन्हा “गेम” उडणार अशी हवा गुन्हेगारी वर्तुळात तयार झाली आहेत. अखेर वर्ष पूर्ण झाल्यानंतर हत्या झाली आहे. वनराज आंदेकर हत्येत प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाडसह जणांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. ते तुरुंगात असले, तरी त्यांचा बदला घेण्याचा कट रचला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक, अभिषेक खोंडला १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

विरोधी टोळीने बदला घेण्यासाठी तयारी केली होती माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येला वर्ष पूर्ण होताच, विरोधी टोळीने बदला घेण्यासाठी तयारी केली होती. वनराज आंदेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर कात्रज भागात रविवारी मध्यरात्री हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता. या कटात एकाला ताब्यात घेण्यात आल्याने कट उधळला गेला. या प्रकरणात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुण्यातील कुख्यात बंडू आंदेकर गट व सोमनाथ गायकवाड टोळीतील वैर मागील काही वर्षांपासून पेटलेलं आहे. 2023 मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिभाते व निखील आखाडेवर हल्ला केला होता. त्यात निखीलचा मृत्यू झाला; तेव्हापासून गायकवाड टोळी बदला घेण्यासाठी टपून होती. त्यातुन बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकरचा 2024 च्या 1 सप्टेंबर रोजी डोके तालीम भागात गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या हत्येने पुण्यात खळबळ उडाली होती. वनराज आंदेकर हत्येला वर्ष पूर्ण होताच पुन्हा “गेम” उडणार अशी हवा गुन्हेगारी वर्तुळात होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube