वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक, अभिषेक खोंडला १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी…

  • Written By: Published:
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक, अभिषेक खोंडला १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी…

Pune Crime News : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेक (Vanraj Andekar) खून प्रकरणात आता मध्य प्रदेश कनेक्शन समोर आलं. आंदेकर यांचा खून करण्यासाठी हल्लेखोरांना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणण्यास मदत करणाऱ्याला पोलिसांनी बुधवारी (ता. 25) अटक केली आहे. त्याला मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.आर. कचरे (V.R. Kachare) यांना एक ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Assembly Election 2024 : शरद पवारांचा दौरा ठरला, चार विधानसभा मतदारसंघातील गणित फिरणार? 

अभिषेक उर्फ ​​आबा नारायण खोंड (रा. लक्ष्मी गार्डन सोसायटी, शिवणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. खोंड याच्या अटकेनंतर या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 21 झाली आहे. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

टोळीवादातून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली असून आरोपी अभिषेक खोंड याने आरोपी आकाश म्हस्के, समीर काळे आणि विवेक कदम यांना त्यासाठी वापरलेले पिस्तूल मध्य प्रदेशातून आणण्यास मदत केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

हत्येनंतर अभिषेक खोंड पसार झाला होता. या काळात त्याला कोणी आश्रय व आर्थिक मदत दिली, त्याने आणखी पिस्तुले आणली का, ती कोणाला विकली, या सगळ्या बाबींचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास पठारे आणि तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केले.

1 सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात आंदेकर यांची पिस्तुलातून गोळी झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. कौटुंबिक वादातून तसेच वर्चस्वाच्या वादातून आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, आतापर्यंत पोलीसांनी अनेकांना अटक केली. यात आंदेकरांची बहीण संजीवनी कोमकर, मेहुणा प्रकाश जयंत कोमकर, गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली.

 

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube