Assembly Election 2024 : शरद पवारांचा दौरा ठरला, चार विधानसभा मतदारसंघांतील गणिते फिरणार?

  • Written By: Published:
Assembly Election 2024 : शरद पवारांचा दौरा ठरला, चार विधानसभा मतदारसंघांतील गणिते फिरणार?

Mahrashtra Assembly Election 2024, Sharad Pawar tour Programme : विधानसभा निवडणुकीसाठी (Mahrashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीमध्ये जागा वाटप सुरू आहे. जागा वाटपाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी आता दौरे सुरू केले आहेत. अहमदनगर, पुणे शहर, सोलापूर मतदारसंघात येत्या तीन दिवसांत शरद पवार यांचे चार दौरे आहेत. या दौऱ्यात अराजकीय कार्यक्रम असले तरी त्यातून विधानसभा निवडणुकीचे तयारी सुरू आहे. या तीन दिवसाच्या दौऱ्यात शरद पवार हे चार विधानसभा मदारसंघात जाणार आहेत. त्यातील एक मतदारसंघ शरद पवार यांच्याकडे आहे. तर तीन मतदारसंघ हे भाजपकडे आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहे. येथील राजकीय गणिते फिरणार आहेत.

मोठी बातमी! छगन भुजबळांची प्रकृती खालावली, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

येत्या शुक्रवारी ते पुणे शहरातील खराडी येथे सभा घेणार आहेत. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. त्यांच्यासाठी शरद पवार यांची सभा आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. महाविकास आघाडीत हे जागा शरद पवार गटाला मिळणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी, 28 सप्टेंबर रोजी ते नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघात येत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे कॉलेजच्या कार्यक्रमासाठी येत आहे. हा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला हवा आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे ही जागा आहे. यंदाही येथून माजी आमदार राहुल जगताप हे पवार गटाकडून इच्छुक आहेत. त्याच दिवशी कर्जत, जामखेड येथे दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

कर्जत येथील दादा पाटील विद्यालयाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे. तर जामखेडमधील खर्डा किल्लाच्या सुशोभिकरण आणि यशवंतराव होळकर यांच्यावरील पुस्तकाचे अनावरण केले जाणार आहे. आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांना आमदार प्रा. राम शिंदे यांना फोडले असून, ते भाजपमध्ये गेले आहे. हा रोहित पवारांसाठी धक्का असला तरी शरद पवार हे मतदारसंघात आल्यास त्याचे डॅमेज कंट्रोल होऊ शकणार आहे.

मोठी बातमी! बिल्किस बानो प्रकरणात सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, पुनर्विचार याचिका फेटाळली

माळशिरस जिंकण्यासाठी रणनिती
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त माळशिरस येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. खासदार धैर्यशील मोहिते यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार हे उपस्थित राहणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते कुटुंब राष्ट्रवादीत आले. निवडणुकीच्या तोंडावर अकलुज येथे पवार येत आहेत. माळशिरस मतदारसंघ एससीसाठी राखीव आहे. या मतदरासंघात उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे पवारांच्या दौऱ्याला महत्त्व आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube