Assembly Elections 2024 : मविआचे जागा वाटप अंतिम ! काँग्रेस-ठाकरे प्रत्येकी शंभर जागा लढणार?

  • Written By: Published:
Assembly Elections 2024 : मविआचे जागा वाटप अंतिम ! काँग्रेस-ठाकरे प्रत्येकी शंभर जागा लढणार?

Maha Vikas Aghadi Seat Sharing : विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections 2024) महाविकास आघाडी (
Maha Vikas Aghadi) आणि महायुतीमध्ये जागा वाटपांचे गुऱ्हाळ सुरू आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत आज शुक्रवारी मुंबईत बैठक झाली आहे. त्यात काँग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरे गट या दोघांना प्रत्येकी शंभर जागा दिल्या जातील, अशी चर्चा झाल्याची माहिती काही वृत्तवाहिनांनी दिलीय.

चौकशी करून नितेश राणेंवर कारवाई करा; अजितदादांच्या आमदाराचे फडणवीसांना उघडपणे पत्र

महाविकास आघाडीचे जागावापट जवळपास 60 टक्के पूर्ण झाले आहे. 288 जागांपैकी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी शंभर जागा मिळणार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 84 जागा दिल्या जाणार आहेत. तर चार जागा या मित्रपक्षांना सोडल्या जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा जिंकल्या आहेत. तर विशाल पाटील हे अपक्ष निवडून आलेले आहेत. ते काँग्रेसमध्येच सहभागी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या आधारावर काँग्रेसने 125 जागांची मागणी केली होती. परंतु आता काँग्रेसला शंभर जागाच दिल्या जाणार आहेत. तर ठाकरे यांच्या गटाला शंभर जागा मिळणार आहे. तर लोकसभेला शरद पवारांना केवळ दहाच जागा मिळाल्या होत्या. त्यात पवारांचे आठ खासदार निवडून आले आहे. लोकसभेला पवारांनी जागा वाटपात पडती बाजू घेतली होती. तर ते विधानसभेला कमी जागा घेऊन लढणार आहेत.

महायुतीसमोर मोठा पेच! रामदास आठवलेंच्या 12 जागांचं गणित कसं सुटणार?


विदर्भाच्या जागांवर रस्सीखेच

मविआमध्ये 80 टक्के जागा वाटपावर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. या भागात काँग्रेसने भाजपला बॅकफूटवर टाकले आहे. तर अनेक माजी आमदार हे काँग्रेसमध्ये आले आहेत. विदर्भात काँग्रेस सर्वाधिक जागा मागत आहेत. त्यामुळे येथील जागांबाबत तिढा सुटलेला नाही. त्यामुळे या जागांबाबत चर्चा झालेली नाही. विदर्भ सोडून इतर भागातील जागा वाटपांबाबत चर्चा झाली आहे. 130 जागांवर मविआतील पक्षांमध्ये एकमत झाले आहे. ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा मिळणार आहे. पण इतर जागांवर ज्या पक्षाची ताकद त्यांना जागा दिली जाईल. काही जागा अदलाबदली केल्या जाणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube