Assembly Election 2024 : काँग्रेसची दिल्लीमधून ‘फिल्डिंग’; मधुसुदन मिस्त्री प्रमुख असलेली महत्त्वाची कमिटी

  • Written By: Published:
Assembly Election 2024 : काँग्रेसची दिल्लीमधून ‘फिल्डिंग’; मधुसुदन मिस्त्री प्रमुख असलेली महत्त्वाची कमिटी

Maharashtra Assembly Election 2024 : येत्या काही महिन्यात महाराष्ट्रासह झारखंड, हरियाणा, जम्मू आणि काश्मिर राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) होत आहे. लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) जबरदस्त कामगिरी करणाऱ्या काँग्रेससाठी विधानसभा निवडणूक अंत्यत महत्त्वाची आहे. त्यात महाराष्ट्रासह राज्यामध्ये काँग्रेस/strong>ला (Congress) सत्तेत यायचे आहे. त्यासाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत आहेत. या विधानसभेसाठी महत्त्वाची स्क्रिनिंग कमिटी काँग्रेसने नेमली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांनी ही कमिती नेमली आहे. (congress constituted the screening committees for the upcoming assembly elections)

महाराष्ट्रासाठी मधुसुदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे. या कमिटीत सप्तगिरी शंकर उल्का, मन्सूर अली खान आणि श्रीवेल्ला प्रसाद हे सदस्य आहेत. तर हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष अजय माकन हे असणार आहे. तर मणिकम टॅगोर, जिग्नेश मेवाणी आणि श्रीनिवास बीवी या कमिटीचे सदस्य असणार आहे.

उत्तर भारतीय महिलांनाही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ; निरुपम यांच्यावर जबाबदारी सोपवली


कमिटी काय करणार ?

विधानसभेसाठी कोण उमेदवार असावा हे स्क्रिनिंग कमिटी ठरविते. ही कमिटी विधानसभा मतदारसंघानुसार तीन जणांच्या नावांचा सर्वे तयार करते. त्यांची आतापर्यंत राजकीय कामगिरी, जातीय समीकरणे या सर्वाचा अहवाल ही कमिटी तयार करते. ही कमिटी केंद्रीय निवडणूक कमिटीला अहवाल पाठविते. त्यानंतर अंतिम उमेदवारी यादी तयार केली जाते. या समितीमध्ये बाहेर राज्यातील नेते असतात. ही कमिटीने पादर्शकपणे निर्णय घ्यावा, असे त्या मागे धारणा असते.

राज्यसभेत भाजपाचं गणित जुळणार? BJD च्या माजी खासदाराचा भाजपात प्रवेश


जागा वाटपाच्या बोलणीसाठी करण्यासाठी तगडे नेते

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढविणार आहे. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने समिती जाहीर केलीय. महाराष्ट्र प्रदेशच्या समितीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री आरिफ नसीम खान, माजी मंत्री सतेज पाटील यांचा भरणार आहे. तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीमधून मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री असलम शेख हे आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube