उत्तर भारतीय महिलांनाही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ; निरुपम यांच्यावर जबाबदारी सोपवली
Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojna) लाभ आता महाराष्ट्रातील महिलांसह उत्तर भारतीय महिलांनाही मिळणार आहे. त्यासाठी शिवसेना नेते संजय निरुपम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलीयं. या योजनेंतर्गत उत्तर भारतीय महिलांनाही महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.
उत्तर भारतीय महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 18 ठिकाणी उत्तर भारतीय संवाद सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून उत्तर भारतीय महिलांना शिवसेनेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, नालासोपारा, कांदिवली, दिंडोशी, अंधेरी, कालिना चेंबूर, घाटकोपर, वरळी या भागात संवाद सभा राबवण्यात येणार असल्याची माहिती संजय निरुपम यांनी दिलीयं.
भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं निधन, पीएम मोदींसह शरद पवारांनी केला शोक व्यक्त
या संवाद सभेची सुरवात उद्या 2 ऑगस्टपासून मालाड येथून करण्यात येणार आहे. या योजनेची अंतिम तारीख 31 जुलै होती मात्र राज्य सरकारने या योजनेची तारीख वाढवलीयं.
राज्याच्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. यासोबतच महिलांसाठी ‘गुलाबी रिक्षा योजने’ची घोषणा केली आहे. 17 शहरांमधील 10 हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.17 शहरांमधील 10 हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.