‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता ‘गुलाबी रिक्षा’ योजना; कोणत्या शहरात किती रिक्षा मिळणार?
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर आता अजित पवारांनी महिलांसाठी ‘गुलाबी रिक्षा योजने’ची घोषणा केली आहे. 17 शहरांमधील 10 हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.17 शहरांमधील 10 हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.17 शहरांमधील 10 हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.17 शहरांमधील 10 हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.
काय म्हणाले अजित पवार
गुलाबी रिक्षा योजनेची घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, आम्ही राज्यातीस महिलांसाठी आणखी एक योजना आणली असून, त्याचे नाव पिंक रिक्षा असे आहे. ज्या गरीब महिला आहे त्यांच्यासाठी ही योजना असून, त्यांनी ऑटो रिक्षा चालवायला शिकायची. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेने 10 टक्के रक्कम स्वतः भरायची आहे. तर, 20 टक्के राज्य सरकार आणि 70 टक्के बँकेचे लोन असेल. या रिक्षाचा रंग पिंक असणार आहे. त्यामुळे ती पिंक रिक्षा म्हणून ओळखली जाईल. यासाठी राज्य सरकराकडून अर्थसहाय्य तसेच सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
योजना नेमकी कशी?
गुलाबी रिक्षा योजनेत रिक्षा खरेदीसाठी 20 टक्के रक्कम सरकार, 10 टक्के रक्कम लाभार्थी तर, 70 टक्के बँकेचे लोन असेल. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची ही सरकारची योजना आहे. या योजनेचा फायदा राज्यातील 17 शहरांमधील सुमारे 10 हजार महिलांना होणार आहे.
कोणत्या शहरात किती महिलांना मिळणार गुलाबी रिक्षा
मुंबई उपनगर 1400, ठाणे – 1000, पुणे, 1400, नाशिक – 700, नागपूर – 1400, कल्याण – 400, अहमदनगर – 400, नवी मुंबई – 500.