काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समिती ठरली! सोनिया-राहुल गांधींसह अंबिका सोनींचा समावेश…

काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समिती ठरली! सोनिया-राहुल गांधींसह अंबिका सोनींचा समावेश…

Congress Election Committee : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने भाजपविरोधातील सर्वच पक्षांची वज्रमूठ बांधली आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या निवडणूक समितीची घोषणा सचिव के.सी वेणूगोपाल यांनी केली आहे. या समितीमध्ये मल्लिकार्जून खर्गेंसह राहुल गांधी, सोनिया गांधी, यांच्यासह अन्य 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील पत्रक के. सी. वेणूगोपाल यांनी प्रसिद्ध केलं आहे.

काँग्रेसच्या निवडणूक समितीमध्ये अधीर रंजन चौधरी, सलमान खुर्शीद, मधुसुदन मिस्त्री, उत्तम कुमार रेड्डी, टीएस सिंह देव, केजे जॉर्ज , प्रितम सिंह, मोहम्मद जावेद, मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, अंबिका सोनी, अमी याजनिक, पीएल पुनिया, ओमकार मर्कम, के. सी वेणूगोपाल यांचा समावेश केंद्रीय निवडणूक समितीमध्ये आहे.

Wadhawan Brothers : तुरुंगातील पंचतारांकित अय्याशी भोवली; वाधवान बंधूंची ताटातूट

आगामी निवडणुकीत भाजपला चारीमुंड्या चीत करण्यासाठी काँग्रेसकडून रस्सीखेच सुरु आहे. त्यासाठी काँग्रेसने देशभरातील एकूण 28 पक्षांना एका छताखाली आणलं असून या आघाडीला ‘इंडिया’ असं नावही देण्यात आलं आहे. आत्तापर्यंत ‘इंडिया’च्या राष्ट्रीय स्तरावर तीन बैठका पार पडल्या असून नूकतीच मुंबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसकडून रणनीती आखली असल्याचं बोललं जातं आहे.

ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, अशा राज्यांमध्ये इंडिया आघाडीचं अधिक लक्ष असणार आहे. त्यामुळे आगामी निवडणूक भाजपला अवघड जाणार असल्याची एकूण परिस्थिती दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube