चौकशी करून नितेश राणेंवर कारवाई करा; अजितदादांच्या आमदाराचे फडणवीसांना उघडपणे पत्र

  • Written By: Published:
चौकशी करून नितेश राणेंवर कारवाई करा; अजितदादांच्या आमदाराचे फडणवीसांना उघडपणे पत्र

Satish Chavan letter to Devendra Fadanvis: भाजप आमदार नितेश राणे हे सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधाने करत आहेत. पण या विधानांना आता महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात येत आहे. राणे यांच्या विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला येत्या विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. त्यामुळे राणेंविरोधात राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी आता थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याविषयी पत्र लिहिले आहे. त्यांनी हे पत्र सोशल मीडियावरही टाकले आहे. आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केलीय.


‘…तर माझ्याऐवजी प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा’, रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा पार्श्वभूमीवर केवळ स्वतःचे राजकारण करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे हे सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक वादग्रस्त व्यक्तव्ये करीत आहेत. यामुळे मुस्लिम समाजामध्ये संतापाची भावना आहे. तसेच याबाबत त्यांच्यांवर कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र, असे असताना देखील ते पुन्हा तशाच पद्धतीने व्यक्तव्ये करत करीत आहेत. यामुळे दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी सामाजिक परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यातून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे या संदर्भात त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, तसेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने देखील त्यांच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी पत्रातून केली आहे.

मेहकरच्या मैदानात रायमुलकरांना कडवं आव्हान; ठाकरे-तुपकर डाव पलटवणार?

नितेश राणे हे राज्यभरात रॅली काढत आहेत. त्यात मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधाने करत आहे. अहमदनगर, सांगलीमधील सभांमधून राणे यांनी मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधाने केले आहेत. त्यात फडणवीस हे गृहमंत्री आहेत. माझे काही होणार नाही, असे विधाने राणे यांनी केलेत. त्यामुळे आता थेट राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी झाल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय भूमिका घेतात हेही महत्त्वाचे आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube