NCP : आमदार अन् माजी मंत्रीच जिल्हा समन्वयक; महायुतीच्या मेळाव्यांसाठी मिळाली ‘खास’ जबाबदारी
NCP News : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने राज्यातील राजकारण (Lok Sabha 2024) ढवळून निघत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटप अंतिम झालेले नाही. त्यातच आता महायुतीने पुढील पाऊल टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व महायुतीच्या इतर ११ घटक पक्षांच्यावतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 36 जिल्ह्यांत जिल्हा समन्वय प्रमुख नियुक्त केले आहेत. या प्रमुखांकडून आता सभा मेळाव्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.
‘आव्हाड हे बेदखल नेते, त्यांचा ‘तो’ दावा निखालस खोटा; सुनील तटकरेंचा पलटवार
१४ जानेवारी रोजी या मेळाव्यांमध्ये महायुतीतील सर्व घटकपक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत तसेच संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि मंत्री उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्याआधी या मेळाव्यांचे व्यवस्थित नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी जबाबदारी देण्यासाठी जिल्हा समन्वय प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये आमदार, माजी आमदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री यांनाच ही जबाबदारी देण्यात आली आहे.
यामध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर-मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, पालघर-जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर, ठाणे-जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, रायगड-आमदार अनिकेत तटकरे, रत्नागिरी – आमदार शेखर निकम, सिंधुदुर्ग-जिल्हाध्यक्ष आबिद नाईक, पुणे-प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, सातारा-आमदार मकरंद पाटील, सांगली-जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, कोल्हापूर-माजी आमदार के. पी. पाटील, सोलापूर-आमदार यशवंत माने, धाराशिव-प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, लातूर-आमदार बाबासाहेब पाटील, बीड-माजी आमदार अमरसिंह पंडित, नांदेड-आमदार विक्रम काळे.
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीचे छापे, आव्हाड म्हणाले, आपलेच घरभेदी सहकारी सामील
परभणी-माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, हिंगोली-आमदार राजू नवघरे, जालना-जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, छत्रपती संभाजीनगर-आमदार सतीश चव्हाण, बुलढाणा-माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, वाशीम-जिल्हाध्यक्ष युसूफ पुजारी, अकोला-आमदार अमोल मिटकरी, अमरावती-प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, वर्धा-माजी मंत्री सुबोध मोहिते, नागपूर-गोंदिया-माजी आमदार राजेंद्र जैन, यवतमाळ-आमदार इंद्रनील नाईक, भंडारा-सरचिटणीस धनंजय दलाल, गडचिरोली-जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, चंद्रपूर-जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, नाशिक-आमदार दिलीप बनकर, अहमदनगर-आमदार संग्राम जगताप, धुळे-सरचिटणीस किरण शिंदे, जळगाव-जिल्हाध्यक्ष संजय पवार, नंदुरबार-जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची जिल्हा समन्वय प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.