आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, राणेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, राणेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) फायरब्रॅन्ड नेते नितेश राणे (Nitesh Rane) हे कायम आपल्या विरोधकांवर खालच्या भाषेत टीका-टिप्पणी करत असतात. दरम्यान, आता आमदार नितेश राणे यांच्याविरोधात नवीन पनवेल पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Atrocity case against BJP MLA Nitesh Rane)

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रतिबंध लावलेले असतांनाही आमदार राणे यांनी आपल्या 16 मे ते 2 जून या काळात केलेल्या भाषणात प्रतिबंधित असलेले शब्द वापरल्यानं त्यांच्यावर वकिलांच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं आता आमदार राणेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच त्यांचे भाषण प्रसिद्ध केल्यानं एका दूरचित्रवाहींनीवर आणि दूरचित्रवाहिणीच्या संपादक मालक, निवेदक यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, असंही या तक्रारीत म्हटलं आहे.

मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मंचावर… पहिल्या वहिल्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी सुनिधी एक्साईट 

या कलमान्वये गुन्हा दाखल
भारतीय दंड संहितेच्या कलम 153-A, 153-B, 295-A आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रतिबंध अधिनियम 2015 च्या कलम 3(1)(r)(s) अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले आहेत. या तक्रारीत आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबद्दल केलेल्या भाषणाचा नमुना देण्यात आला आहे. या भाषणाचा पुरावा वकील अमित कटारनवरे यांनी न्यायालयात दाखल केला आहे.

न्यायालयाचा आदेश मिळताच गुन्हा नोंदवा
कटारनवरे यांनी या भाषणातील वादग्रस्त तपशील पनवेलच्या सत्र न्यायालयात तक्रारीत मांडल्यानंतर न्यायाधीशांनी पोलीस विभागाला आदेश काढून सीपीआरपीसी 156(3) कलमान्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube