‘…तर माझ्याऐवजी प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा’, रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
Ramdas Athawale : आगामी विधानसभेच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळं सर्वच नेते आणि राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) एनडीएत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकरांसाठी आठवलेंनी केंद्रीय मंत्रिपद सोडण्याची तयारी देखील दर्शववली आहे.
मेहकरच्या मैदानात रायमुलकरांना कडवं आव्हान; ठाकरे-तुपकर डाव पलटवणार?
रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने थोडा सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. वंचितने महायुतीत (एनडीए) यावं, त्यांना माझं निमंत्रण आहे. ते महायुतीत आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल. ते आले तर मला मंत्री नाही केलं तरी चालेल, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा, अशी मागणी मी स्वत: करेन, असं आठवले म्हणाले.
मेहकरच्या मैदानात रायमुलकरांना कडवं आव्हान; ठाकरे-तुपकर डाव पलटवणार?
दरम्यान, महायुतीतील काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याविषयी विचारलं असता आठवले म्हणाले, विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळेल याची खात्री नसलेले लोक शरद पवार यांच्याकडे जात आहेत. आम्ही याचा अत्यंत बारकाईने अभ्यास करत आहोत.
वन नेशन, वन इलेक्शनला पाठिंबा…
नुकतीच केंद्र सरकार वन नेशन, वन इलेक्शनच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. मात्र, विरोधकांनी त्याला विरोध केला आहे. यावर आठवले म्हणाले, पूर्वी वन नेशन वन इलेक्शन अशी व्यवस्था होती. संविधानात अशी तरतूद होती. सुरुवातीला काही निवडणुका अशाच झाल्या आहेत. त्यामुळं देशाचा फाय़दा होणार आहे. हा काही हुकूमशाही आणण्याचा विषय नाही. या विधेयकाला माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे.
महायुतीचे जागावाटप युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या महायुतीचे जागावाटप तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटप सुरू आहे. या जागावाटपात मित्रपक्षांचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, आता रामदास आठवलेंनी विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीकडे 10 ते 12 जागा मागणार असल्याचे सांगितलं. ते म्हणाले, विधानसभेत भाजपच्या कोट्यातून आम्हाला 10 ते 12 जागा मिळाव्यात आणि सरकार आलं तर 1 ते 2 मंत्रीपदे मिळावित, महामंडळ मिळावीत, अशी अपेक्षा असल्याचं आठवलेंनी सांगितलं.