लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेल, आधी शारीरिक संबध नंतर दरीत लोटून दिल…

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपास करून सहा आरोपींना अटक केली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 77

Accused of being beaten and pushed into a deep ravine : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 40 वर्षीय महिलेचा 6 जणांनी मिळून खून केला आहे. शफिया सलीम शेख (वय 40, दांडेकर पूल),असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. झालं असं की, 10 फेब्रुवारीला मांगडेवाडी येथील एका क्रशर खाणीत तिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपास करून सहा आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शफिया शेख ही महिला वेश्याव्यवसाय करायची. 8 फेब्रुवारीच्या रात्री साडेनऊच्या सुमारास ती कोंढवा परिसरातील कान्हा चौकात मद्यधुंद अवस्थेत उभी होत्या. त्यावेळी आरोपी केशव कमलेश चौधरी (20), सोन्या लक्ष्मण पवार (18) आणि अब्दुल मोहम्मद शेख (23) यांनी त्यांना पाहिले. तिघांनी शफिया यांना कात्रज येथील एका लॉजवर घेऊन जायचं ठरवले. मात्र लॉजवर न नेता त्यांना मांगडेवाडीतील क्रशर खाणीजवळील डोंगरावर नेण्यात आले. त्यानंतर आरोपी महादेव अर्जुन व्होरडे (40), साई अमित पुजारी (19) आणि सोहेल हनीफ खान (20) तेथे पोहोचले.

तरुणीवर अत्याचार अन् व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग; माजी महापौर अभिषेक कळमकरांवर गुन्हा दाखल

त्यानंतर मयत शाफिया आणि आरोपी डोंगरावर मद्यपान करत असताना शफिया आणि आरोपींमध्ये लॉजवर न नेल्यावरून वाद झाला. डोंगरावर का आणले, असा सवाल करत शाफिया यांचा आरोपींसोबत वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात शफिया यांना मारहाण केली आणि खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.

दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी खाणीत महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासात सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सुरू आहे.

follow us