पुण्याच्या कसबा गणपती मंदिरात चोरी;‘इतकी’ रक्कम घेऊन चोरटा पसार, परिसरात खळबळ
Kasba Ganpati Temple Theft; मध्यरात्रीच्या सुमारास एक अज्ञात चोरटा मंदिरात शिरला आणि त्याने दानपेटी फोडली.
Kasba Ganpati Temple Theft: पुण्यातील कसबा गणपती मंदिरात काल (5 ऑक्टोबर) मध्यरात्री चोरीची घटना घडली. मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये हा चोरीचा प्रकार कैद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास एक अज्ञात चोरटा मंदिरात शिरला आणि त्याने दानपेटी फोडली. दानपेटीत असलेली अंदाजे 60 हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरटा पसार झाला.
…त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वाटतंय, विक्रम पाचपुतेंची रोहित पवारांवर बोचरी टीका
घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांना याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून हाती घेण्यात आले आहे.
भाजपला ‘ज्ञानेश-जी’ नाही, भगवान गणेश मदत करत आहेत; संबित पात्र काँग्रेसवर भडकले
पुण्याच्या ग्रामदैवताच्या मंदिरातच चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्याने मंदिरात प्रवेश कसा केला, चोरी केल्यानंतर तो कोणत्या दिशेने पसार झाला, याचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यापर्यंत पोहोचण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.